युवक मित्र परिवार संस्थे मार्फ़त राबविल्या जाणाऱ्या सायकल बँक उपक्रमाअंतर्गत 30 विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप
जळगाव/ प्रतिनिधी/महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय,बोळे ता.पारोळा जि.जळगाव येथे 30 विद्यार्थ्यांना ‘युवक मित्र परिवाराच्या ‘सायकल बँक’ उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप.
युवक मित्र परिवार संस्थे मार्फ़त राबविल्या जाणाऱ्या सायकल बँक उपक्रमाअंतर्गत ‘महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, बोळे ता.पारोळा येथे बोळे टांडा,शेवगे प्र.कराड़ी येथून 3 ते 4 की.मि.पायी चालत येणाऱ्या अत्यंत गरीब व गरजु अशा 30 विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून *पुणे येथील युवक मित्र परिवार संस्थेचे संस्थापक तथा सायकल बँक योजनेचे प्रमुख प्रवीण महाजन हे होते.तर अध्यक्षस्थानी डॉ. जितेंद्र गिरासे* हे होते.
राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त आयोजित या कार्यक्रमात युवक मित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी याच अठवड्यात संपूर्ण खान्देशातील शाळा मध्ये २५० सायकली वाटप करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी सायकल दुरुस्ती करीता शाळेचे माजी विद्यार्थी तथा अमेरिका येथील अभियंता कैलास गिरासे यांचे सहकार्य लाभले.