गावा गावात होणारे बालविवाह थांबलेच पाहिजे-प्राचार्य डॉ आर एस फुन्ने.
पाथरी /प्रतिनिधी / अहमद अन्सारी/ परभणी .जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असून या मुळे दोन्ही कुटूंबाचे नभरून येणारे नुकसान होते त्या मुळे बाल विवाह थांबले पाहिजेत.त्या साठी साजातील सर्व स्तरातील नागरीकांनी सजग राहून या विषयी जागृती निर्माण करत बालविवाहाला प्रतिबंध घालण्या साठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन स्व नितीन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस फुन्ने यांनी स्वारातीम नांदेड आणि स्व नितीन महाविद्यालय आयोजित पोहेटाकळी येथील “युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” या विषेश युवक शिबिरा दरम्याम अध्यक्षिय समारोप प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या शिबिराचे उदघाटन पोहेटाकळीच्या सरपंच सौ प्रणिताताई शामराव गोंगे यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आर एस फुन्ने हे होते तर प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष मुरलीधर गोंगे,उपाध्यक्ष कल्याण गोंगे,पत्रकार लक्ष्मण उजगरे,विकास गोंगे,बापुराव गोंगे,ग्रा पं सदस्य अशोक शिंदे कार्यक्रमाधिकारी प्रा तुळसीदास काळे,सहकार्यक्रमाधकारी प्रा डॉ गणपती मोरे यांची मंचावर उपस्थिती होती.
हे रासेयोचे शिबिर सात दिवस चालनार असून यात श्रमदाना सह प्रबोधन,सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. बुधवार १८ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा तुळशीदास काळे यांनी केले तर सुत्र संचलन आणि आभार प्रा डॉ गणपती मोरे यांनी मानले.
या वेळी रासेयोचे स्वयंसेवक विद्यार्थी,विद्यार्थीनी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.