जमीयत उलमा ए हिन्द च्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न..

0
106

जमीयत उलमा ए हिन्द च्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न..!

 

समारोहात तीन विद्यार्थ्यांना ५० हजाराची मदत

बीड (प्रतिनिधी) – येथील नगर परिषद कॉम्प्लेक्स मध्ये जमीयत उलमा ए हिन्द कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. उद्घाटन समारोहात तीन गरीब विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.


या वेळी बोलताना जमीयत चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्दिकी म्हणाले, गोरगरिबांच्या मदतीसाठी जमीयतने सतत पुढाकार घेतला आहे. अस्मानी संकट असो की, नागरिकांच्या समस्या असो, जमीयत पुढे येऊन अनेक वेळा मदतीचा हात पुढे करते. अशाच प्रकारे आजच्या कार्यक्रमात ही तीन विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये स्कॉलरशिपची मदत म्हणून देण्यात आली. यात दोन विद्यार्थ्यांना वीस-वीस हजार तर एका विद्यार्थ्याला दहा हजार रुपये मदत देण्यात आली. याशिवाय नागरिकांच्या व गोरगरिबांच्या समस्या कशा सोडवाव्या ? त्यांना कसे सहकार्य करावे ? त्यांची मदत कशा पद्धतीने करण्यात यावी ? असे प्रश्न या उद्घाटन समारंभामध्ये विषद करण्यात आले. जीवन जगणाऱ्या मनुष्याच्या आयुष्यातील मूळ काय आहे ? माणसांना माणुसकीतून कशा प्रकारची मदत करता यावी ? व त्यांना कशा पद्धतीने एक दुसऱ्याशी जोडता येईल, या विचारानुरूप जमीयत सदैव कार्य करीत आहे आणि करीत राहणार असे म्हटले.

यावेळी मत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला यांनी म्हटले की, कामासाठी कार्यालय असणं गरजेचं नसून काम व कष्ट करणे गरजेचे आहे.
हा उद्घाटन समारोह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुज्तबा अहेमद खान, काजी मुजीबुर्रहमान, सय्यद हसीन अख्तर, मौलाना साबीर, मुफ्ती अब्दुल्ला, मौलाना वसीम कासमी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमात माजी आमदार सिराजुद्दीन देशमुख, मोईनुद्दीन मास्टर, संपादक काजी मकदूम, शेख निजाम,खुदाई खिदमतगार, संघटना के अध्यक्ष पठाण आयुब खान, मौलाना सरफराज, खमर भाई, अफसर, हाफेज सरताज, असद भाई धारूर, नाजेम, नुमान चाऊस, क़ारी साद, हमीद पाले, मुख्तार भाई, अजहर तलाठी, हाफेज मन्सूर, दस्तगीर, खुर्शीद आलम, खदीर खान, शेख मजहर, अरबाज साजेद नेकनुर, सय्यद तौफीक, हाजी एकबाल, फूरखान कुरेशी, हाशीम बागवान, हाजी नजीर, सय्यद मिस्त्री, फरीद देशमुख, रफिक तांबोळी, शेख अखील शिवसंग्राम, नबीलुज्जमा, अशपाक इनामदार, जैतुल्लाह खान, नसीर अन्सारी, काजी जफर, हाफिज असीम वडवणी, सरताज, हाफिज शाहिद कुरेशी, डॉ. नासेर बागवान, मिर्झा शकील, मिर्झा परवेज, आतेफ भाई, मुफ्ती आमेर, डॉ. अर्शद परळी, आवेज सय्यद, तौफिक, पठाण अमरजान, शेख फारुख, ज्येष्ठ पत्रकार सी.आर. पटेल आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here