मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानूरला येणार सरपंच अशोक मामांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेट..
मुंबई(प्रतिनिधी)मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना माजी आ.राम पंडागळे आणि सरपंच अशोक मामा पाखरे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच एक शिष्टमंडळ भेटले. मानूर येथे होणार्या वै.वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्ताहाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. हे निमंत्रण त्यांनी स्विकारले. त्याच प्रमाणे मानूरच्या विविध विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
माजी आ.राम पंडागळे हे मानूरचे सुपुत्र असून सध्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मागासवर्गीय सेल प्रमुख आहेत.त्यांच्या माध्यमातून सरपंच अशोक मामा पाखरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ नुकतेच मुख्यमंत्र्यांना भेटले. या प्रसंगी जेष्ठ नेते कलंदर काका पठाण उपस्थित होते. मानूर गावच्या विविध प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या मध्ये मानुर पंचक्रोशी येथील अनेक दिवसाची मागणी असलेल्या जाटवड साठवण तलाव, मानुर येथील तीर्थ विकास योजनेंतर्गत नागनाथ देवस्थानचा विकास,मानुर ते टाकळी रस्ता मुख्यमंत्री ग्रामीण योजनेंतर्गत समावेश करण्यात यावा,मानुर ते पिंपळगाव टप्पा रस्ता करणे, मानुर ते मुलानी वस्ती तिनखडी रस्ता,मानुर ते टाकळी रस्त्यावर पुल करणे, रामा 59ते सोलेवाडी टाकळी रस्ता करणे,मानुर व वाडया अंतर्गत सिमेंट रस्ते करणे , मानुर येथे समाजकल्याण विकास योजनेंतर्गत बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहा बाधने, तीर्थ विकास योजनेंतर्गत महेबूब सुभाणी दर्गा परिसराचा विकास करणे, तीर्थ विकास योजनेंतर्गत सिद्धेश्वर मंदिर देवस्थान परीसरात विकास करणे, तीर्थ विकास योजनेंतर्गत राम मंदिर परिसरात विकास करणे,मानुर येथे शादी खाना बाधने, मानुर व सर्व चारी वाडयाना एल ई डी लाईट बसवने इत्यादीं कामे लवकरच करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथरावशिंदे यांनी मागसवर्गीय शिवसेना विभागाचे राज्य समन्वयक मा, आमदार राम पंडागळे, यांना दिले व सतं श्री वामभाऊ याच्या नारळी सप्ताह निमित्त मानुर येथे येण्याचे आश्वासन दिले व नवनिर्वाचित सरपंच आशोकराव पाखरे पाटील यांचे निवडुन आल्या बदल अभिनंदन केले.