शेख मोहसीन यांचा अनेक समर्थकांसह काँग्रेस आय पक्षात प्रवेश
बीड (प्रतिनिधी) – शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी आपल्या अनेक समर्थकांसह काँग्रेस आय पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. यावेळी असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात बळकटी मिळवून देण्यासाठी तसेच देशाचे युवराज तथा काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार सौ. रजनीताई पाटील, माजीमंञी अशोक दादा पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मागे तरुणांची मोठी फळी घेऊन काँग्रेस पक्षाला बीड जिल्ह्यात पुन्हा पहिल्यासारखी उर्जितावस्था निर्माण करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्यासह आता पक्षीय पातळीवर जाऊनही अडल्या नडलेल्या जनतेच्या कामी यायचे आणि काँग्रेसला पूर्व वैभव प्राप्त करून द्यायचा मानस पक्षप्रवेशावेळी बोलताना दिला. याचे उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
आज आपल्या समर्थकांसह काँग्रेस आय पक्षात प्रवेश करणारे शेख मोहसीन हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत अग्रेसर आहेत. आतापर्यंत त्यांनी जनहितासाठी अनेक कामे केली, आंदोलने केली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आज काँग्रेस आय पक्षामध्ये प्रवेश देऊन आम्हालाही आनंद होतोय. त्यांचा पक्ष प्रवेश घेऊन आम्ही शांत बसणार नाही. तर त्यांच्या खांद्यावर लवकरच पक्षाच्या पदाधिकारी पदाची जबाबदारी टाकणार आहोत. आशा आहे त्यांना दिलेली जबाबदारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतील असे राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले.
कार्यक्रमाची प्रस्तावना शहराध्यक्ष परवेज कुरेशी यांनी केली. सूत्रसंचालन ओबीसी शहराध्यक्ष सय्यद फरहान यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव, स्वयंरोजगार प्रदेश सचिव गणेश जवकर, सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ. मोटे, किसान सेल जिल्हाध्यक्ष अमोल पाठक, युवक तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, विधी सेल अध्यक्ष अॅड. गणेश करांडे, शहर उपाध्यक्ष मिलिंद मस्के, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, असंघटित जिल्हाध्यक्ष संतोष निकाळजे, सेवादल कार्याध्यक्ष तकसन तुपे, परळी शहर चिटणीस शिवाजी देशमुख, शिरूर शहराध्यक्ष रमेश सानप, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अमजद कुरेशी, अशोक देशमुख, ओबीसी शहर उपाध्यक्ष नाजिद शेख आणि असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.