अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगावजवळ पुन्हा झाला अपघात
बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
अंबाजोगाई /प्रतिनिधि/ आरेफ सिद्दीकी/लोखंडी सावरगाव जवळील भरधाव वेगातील बसने दुचाकीला समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झाला. संजय अंकुश डहाणे (वय ५०, रा. कोदरी, ता. अंबाजोगाई) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.