विद्यार्थ्यांनी विषयातील कौशल्यांची जपवणूक करणे काळाची गरज:  डॉ. संजय मून

0
115

विद्यार्थ्यांनी विषयातील कौशल्यांची जपवणूक करणे काळाची गरज:  डॉ. संजय मून

परळी वैजनाथ /प्रतिनिधी/ येथील नवगण कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आयोजित आजीवन शिक्षण व विस्तार सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागाचे संचालक डॉ. संजय मुन हे बोलत होते

प्राचार्य कॅप्टन डॉ.एम.जी राजपांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी यावेळी व्यासपीठावर डॉ प्रकाश फड, डॉ लालासाहेब घुमरे , प्रा. राहुल सोनवणे इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. म्हणून म्हणाले की आपल्या  देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये कौशल्य भरपूर भरपूर आहेत त्याचा शोध आणि उपयोजन गरजेचे आहे. यावेळी नवगण महाविद्यालयामध्ये ‘कोविड काळातील अनुभव” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली त्याचे प्रथम पारितोषिक ऋतुजा मोगरे द्वितीय पारितोषिक श्वेता दुबे तर तृतीय पारितोषिक कुमारी मायावती मोगरे यांना प्रदान करण्यात आले.

 कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ राजपांगे म्हणाले की आजीवन शिक्षण व विस्तार सेवा केंद्रामुळे विद्यार्थ्यांना आपल्या प्रात्यक्षिक ज्ञानाच्या उपयोजनाची चांगली संधी मिळते महाविद्यालयातील या केंद्राचा लाभ सर्वांनी घ्यावा.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे अधिकारी प्रा. राहुल सोनवणे यांनी केले तर प्रस्ताविक प्रा. भीमराव मंडलिक यांनी केले कार्यक्रमाचे आभार विभागाचे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश फड यांनी व्यक्त केले

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here