व्यक्तिमत्व विकासाचे समाजसेवा प्रभावी माध्यम – डॉ. अब्दुल करीम सालार यांचे प्रतिपादन
इकरा थीमच्या राष्ट्रीय सेवा योजनाचा विशेष शिबिराचा समारोप
जळगाव प्रतिनिधी/ दि. 24 /1: राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचे सामाजिक चळवळीत रूपांतर झाले आहे. शिबिरार्थींनी सामाजिक बांधिलकी जोपासावी. व्यक्तिमत्व विकासाचे समाजसेवा प्रभावी माध्यम आहे. अजुनही समताधिष्ठित समाज निर्माण करण्यास बराचसा वाव आहे असे मार्गदर्शन करताना इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी नशिराबाद येथे जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक 1 मध्ये आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या समारोप प्रसंगी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना म्हटले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते . कार्यक्रमात जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष लालचंद पाटील ,माजी सरपंच पंकज महाजन , इकरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह , संस्थेचे सचिव एजाज अहमद अब्दुल मलिक, मजीद शेठ जकेरिया, मुख्याध्यापक मसूद शेख, आरिफ शेख, अझरुद्दीन शेख ,जाफर शेख, वकारुद्दीन शेख उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व शिबिराचा अहवाल डॉ. राजू गवरे यांनी सादर केला.
कार्यक्रमात मुख्याध्यापक मसुद शेख ,लालचंद पाटील ,पंकज महाजन , एजाज मलिक तसेच विद्यार्थी तनवीर, फैजान, सबा कौसर ,उजमा कौसर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थिनींमध्ये बेस्ट ग्रुप ‘गार्डन गर्ल्स’ तर विद्यार्थ्यांमध्ये ‘गोल्डन बॉईज’ ग्रुपची निवड करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये आदर्श शिबिरार्थी सबा कौसर व विद्यार्थ्यांमध्ये तनवीर शेख खलील यांना ‘ स्वर्गीय कर्नल अब्दुल लतीफ सालार ट्रॉफी’ देऊन सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालक या विद्यार्थिनीने तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. तनवीर खान यांनी व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राजू गवरे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. तनवीर खान, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.शबाना खाटीक ,डॉ. हाफिज शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात प्रा. डॉ. राजेश भामरे, प्रा. मुजम्मिल काझी, प्रा. डॉ. चांद खान ,प्रा. डॉ. वकार शेख , निदान वकार शेख ,रुबीना अब्दुल रजाक शेख आदींची उपस्थिती होती .या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.