आष्ट्याच्या सिद्धिविनायक स्कूलची शहीदा मुल्ला हीची इन्स्पायर अवार्ड साठी अभिनंदनीय निवड
इस्लामपूर दि (प्रतिनिधी)इकबाल पीरज़ादे
भारतातील प्रसिद्ध इन्स्पायर अवार्ड साठी आष्टा येथील सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी शाहिदा माजिद मुल्ला हिची निवड झाली. शालेय स्तरावर नवकल्पना मांडण्यासाठी भारत सरकार तर्फे या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. रुपये दहा हजार व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे या पद्धतीचे पुरस्कार दिले जातात. भारताने विश्वगुरू व्हावे व नव्या पिढीने वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधन करावे यासाठी शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड व्हावी यासाठी हे पुरस्कार दिले. जातात रयत शिक्षण संस्थेतील डॉ. माजिद मुल्ला यांची ही कन्या असून डॉ.मुल्ला यांनीही संशोधनांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
पुरस्काराबद्दल सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापन समितीने व मुख्याध्यापक, शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले असून परिसरात तिचे कौतुक होत आहे.