अल्पसंख्याक समाज संबंधित समस्यांबाबत उदासीन जिल्हाधिकारी साहेबांच्या निषेधार्थ आक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा :- सुफियान मनियार
बीड ( प्रतिनिधी) – अल्पसंख्यांक समाज संबंधित समस्या व प्रश्नांबाबत उदासिन भूमिका घेणाऱ्या बीड जिल्हा प्रशासनाच्या विरोधात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या आक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकसेना संघटना बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार यांनी केले आहे.
गेल्या तीन वर्षापासून लोकसेना संघटना मागणी करत आहोत की अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत करावी, प्रधानमंत्री 15 सूत्री कार्येक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, उर्दू घर मंजूर होऊन 7 महिने झाले तरी या प्रकरणी जिल्हा प्रशासन कोणतीही कार्यवाही सुरू करत नाही,परळी शहरातली अल्पसंख्यक मुली व मुलांचा वसतिगृह लवकरात लवकर सुरू करा,फारसी व उर्दू भाषेतील महसूली कागदपत्रे मराठी भाषांतर करण्यासाठी जाणकार कर्मचारी नियुक्त करा, अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रश्न, मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाच्या बजेट मध्ये वाढ, वक्फ बोर्ड प्रश्न, जातीचे प्रमाणपत्र समस्या, जात वैलिडिटी समस्या व इतर मुद्द्यावर वारंवार पाठपुरावा करत आहे.
परंतू बीड जिल्हाधिकारी साहेबांनी अल्पसंख्याक समाजाशी ॲलर्जी आहे, साहेबांना अल्पसंख्याक समाजाचे न प्रश्न सोडवण्याचे आदेश आहेत का?
१८ डिसेंबर हा दिवस जागतिक स्तरावर अल्पसंख्याक हक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतात व भारतातील तमाम राज्यात व जिल्ह्यात पण हा दिवस मोठ्या हर्षोल्लासाने साजरा केला जातो या दिवशी जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन व राष्ट्रीय स्तरावर विविध स्वंयसेवी संस्था सामाजिक संघटना लोकप्रतिनिधि सामाजिक कार्यकर्ते- नेत्यांसोबत शासन-प्रशासन समाजाच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, रोजगार, संरक्षण, न्याय, आरोग्य या विषयावार चर्चा करण्याचा प्रयत्न करतो अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नावर समस्यावर चर्चा केली जाते त्यावर तोडगा काढण्यात येतो पण यावर्षी बीड जिल्हाधिकारी यांना यादिवसाचा चक्क विसर पडला आहे अशा विसर पडणा-या जिल्हाधिकारी यांच्या उदासीन व दुहेरी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लोकसेना संघटना प्रमुख प्रा.इलियास इनामदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर आक्रोश आंदोलन करत आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन लोकसेना संघटना बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार, शहर अध्यक्ष अयाज अख्तर, उपाध्यक्ष शेख समोर, सालेम भय्या, अकबर अतार, शेख रजी, शेख आरिफ व इतरांनी केले आहे.