डॉ.संजय तायडे यांना पहिल्या पसंतीचे मतदान करा. प्रहार जनशक्ती अध्यक्ष आ.बच्चु.यांचे आवाहन

0
104

डॉ.संजय तायडे यांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन विधानपरिषदेत पाठवा.. 
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आ.बच्चु कडू यांचे बीड येथे आवाहन


बीड(प्रतिनिधी)- अपंगाचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी वेगळे अपंग मंत्रालय निर्माण केले त्याद्वारे अपंगांचे सर्वच प्रश्न मार्गी निघण्यास सोयीचे होईल असा उमेदवार म्हणजेच डॉ.संजय तायडे यांना शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी व अपंगाचे प्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या पसंतीचे मत देवून विधानपरिषदेत पाठवा असे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चु कडू यांचे बीड येथे झालेल्या आशिर्वाद लॉन्स येथील अपंगाच्या मेळाव्यात  संबोधित करतांना आवाहन केले आहे यावेळी मंचावर डॉ.संजय तायडे पाटील, जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास काळुंके, रघुनाथ तोंडे यांची उपस्थिती होती.

या वेळी आ.बच्चु कडू यांचा जिल्हा अपंग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.पुढे बोलतांना आ.बच्चु कडू  म्हणाले  की,  तसेच बीड जिल्ह्यातील अपंग बांधवांनी अपंग बचत गटाद्वारे प्रगती करावी. विद्यमान आमदार यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले  की, गेल्या पाच वर्षात शिक्षकांचे किती प्रश्न सुटले या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आजी आमदारांनी काय केले

याचा लेखाजोगा आता काढायला नको? मात्र डॉ.संजय तायडे यांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे डॉ.संजय तायडे सारखे लोकांमध्ये सहभागी असणारे उमेदवार जर विधानपरिषदेत पोहोंचले तर प्रामुख्याने कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना, शाळेला अनुदान, स्वतः अर्थसहाय्यीत तत्वावर मान्यता दिलेल्या शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न करतील तसेच टीईटी परिक्षा रद्द करुन शिक्षक भरती लवकर कशी करावी हा प्रयत्न करतील,  इंग्रजी शाळांना गोवा पॅटर्न प्रमाणे अनुदान मिळवून देवू, विद्यार्थी पटसंख्या वाढलेली असल्यास त्या ठिकाणी आरटीईच्या निकषाप्रमाणे शिक्षक पदांना मान्यता व अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करु इत्यादी प्रमुख प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जनतेतील उमेदवार विधानपरिषदेत असणे गरजेचे आहे

त्या मुळे डॉ.संजय तायडे यांनाच पहिल्या पसंतीचे मत देवून विजयी करा असे आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले यावेळी कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव, माजी मराठवाडा अध्यक्ष शहादेव उमाप,श्री.सोनवणे, महिला बीड जिल्हाध्यक्ष शिला उजगरे, जिल्हा उपाध्यक्ष शाहू डोळस,  जिल्हा संपर्क प्रमुख विलास रुद्रवार, शेख रहीम, लक्ष्मण काळे, पद्मीन तारडे, राजकुमार थेटे,बाळासाहेब बहिर, रामराजे कुलगुडे, आरेकर, अंकुश सोनवणे, महादेव डोईफोडे, दोडके, बारगजे, आमटे, मजमुले, गुदस अली इत्यादी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here