मांजरसुंबा जि.प.प्रा. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
शाळेच्या परिसरात व प्रत्येक 1/8 वर्गात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीड / प्रतिनिधी/ ७३ वा भारतीय प्रजासत्ताक मांजरसुभा येथील जिल्हा परिषद प्राथमिक ऊर्दू शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ७:३० वाजता सरपंच मनिषाताई अरुण रसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मांजरसुभ्यातील प्रमुख रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन का साजरे करण्यात येते तसेच प्रजासत्ताक दिन व संविधान मानवी जीवनाला किती महत्त्वाचे आहे असे अनेक विषयांवर भाषण तसेच विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन कौतुकाची थाप देण्यात आली.
या वेळी शाळेच्या आवारात पालक व शिक्षणप्रेमी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर केंद्र प्रमुख तोंडे सर,दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक सय्यद आफरोज बाजी,बनसोडे कल्पना मॅडम शालेय समिती अध्यक्ष सय्यद अहमद ( राजुभाई ) गुलाब,कोळी महादेव, शिक्षक व पालकांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने शाळेच्या आवारात व प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बाबतीत चर्चा करण्यात आली व सीसीटीव्ही बसवण्याचे ठराव घेण्यात आले. यावेळी पालक व शिक्षण समितीच्या वतीने त्यावर भर देत सध्याच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे किती आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी किती महत्त्वाचे आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांचे दप्तराचे औझे कमी करण्यासाठी अद्यावत प्रोजेक्टर, लायब्ररी,तसेच नादुरुस्त फिल्टर बदलण्यात यावे,शाळेच्या आवाराच्या घाणी बद्दल चिंता व्यक्त करत यामध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी समिती अध्यक्ष सय्यद अहमद गुलाब उर्फ राजुभाई,कोळी महादेव, माजी उपसरपंच गजानन चौधरी.शेख शफीक,नुरानी मरकज चे शाही इमाम हाफीज अतहर साब,जामा मस्जिद चे इमाम हाफीज इस्लाम साब, हकीम अलीम मौलाना तय्यब साहब, उपसरपंच शेख अजीज, ग्रा. प.सदस्य सय्यद चांद नुर,शेख मंजूर शेख, इंगोले संदिप, वाघमारे विकी,माजेद अली,सूर्यकांत रसाळ,आशोक रसाळ, पठाण शकील,आजिमभाई.. असलम भाई,शेख मुशिर, सय्यद लतिफ, अजर,कौसर सय्यद व सर्व शिक्षक समस्त गावकरी मंडळी इत्यादी उपस्थित होते.