मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुंबई येथे नवनिर्वाचित सदस्य भेट..
परतुर/प्रतिनिधी/ परतुर..आज दि.३१/१/२०२३ रोजी शरद भगवानराव सोळंके यांची विविध सहकारी सोसायटी सिंगोना ता.परतुर चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी मुंबई येथे शरद सोळंके यांना शुभ आशीर्वाद दिला, यावेळी परतूर मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विशेष फंडातून ग्रामपंचायतला मदत केली जाईल असे जाहीर करून ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या गावातील विकास कामाबाबत आमच्यापर्यंत मागणी करा असेही धोत्रे यांनी सांगितले,
मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 या राष्ट्रीय महामार्गाचे काम बरोबर झाले नाही म्हणून या राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली करू नये या बाबत श्रीमान राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर,दिलीप नाना बनकर, वैभव मिटकर संभाजीनगर,प्रकाश सोळंके,गजानन गीते,बळीराम खटके, गणेश सुरवसे,शेख राज, रुपेश देशमुख परभणी, बंडू कुटे हिंगोली, मोंटी सिंग नांदेड, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, प्रशांत नवगिरे, प्रा.राजेंद्र गपाट,आबासाहेब ढवळे धाराशिव, शडॉ नरशिंग भिकाने, शिवकुमार नगराळे लातूर, सह्या असलेले पत्र मा. साहेबांना दिले हा विषय मी बघतो असे राज साहेबांनी सांगितले, तसेच मराठवाड्यातील ग्रामपंचायत सदस्य विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन सदस्य यांनी राज साहेबांची भेट घेतली सोबत राम नवल उपजिल्हाध्यक्ष, कृष्णा गोवर्धन सोळंके तालुकाध्यक्ष परतुर, ज्ञानेश्वर केव्हारे मनविसे जिल्हाध्यक्ष जालना, तानाजी आबासाहेब सोळंके ग्रामपंचायत सदस्य, अर्जुन माहिती, तुकाराम कदम, आत्माराम जगताप, अंगद लाटे, मारुती लोमटे, कृष्णा वैद्य, इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…