फिरोज पठाण पत्रकार यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ५ गुंडां अटक…
सर्व आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदा व मोका अंतर्गत कारवाई करावी..
चांदवड , प्रतिनिधी/ पत्रकार फिरोज पठाण व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडांवर पत्रकार संरक्षण कायदा व मोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत ~शेख बरकत अली
चांदवड येथील पत्रकार महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज सुलतान खान पठाण यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर दिनांक 13.1.2023 रोजी तेथील गुंडप्रवृत्तक अवैध व्यावसायिक व खंडणीखोर मंजूर अकील घासी व त्याच्या इतर साथीदारांनी प्राण घातक हल्ला करून जिवे ठार
मारण्याचा प्रयत्न केला या घटनेतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु या टोळीचा मोरक्या मंजूर घासी याला अटक करण्यात चांदवड पोलीस अपयशी ठरले आहे
चांदवड येथील पत्रकार महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज सुलतान खान पठाण यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर दिनांक 13.1.2023 रोजी तेथील गुंडप्रवृत्तक अवैध व्यावसायिक व खंडणीखोर मंजूर अकील घासी व त्याच्या इतर साथीदारांनी प्राण घातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु या टोळीचा मोरक्या मंजूर घासी याला अटक करण्यात चांदवड पोलीस अपयशी ठरले आहे
पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली व इतर पदाधिकारी व सदस्य यांनी जाऊन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन येथील अधिकाऱ्यांशी कारवाई संदर्भात चर्चा केली तसेच पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलन व उपोषणास सुरुवात करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी उस्मान के शेख, सुखदेव सोमा केदारे, फिरोज खान पठाण, असलम बिन साद, शौकत पठाण, एजाज सय्यद, सूर्यकांत गोसावी, कासम सय्यद रसूल सय्यद सखाराम पगारे नवनाथ खुरसणे राहुल कोळगे, रंगनाथ गंगाधर, मन्सूर भाई पठाण, यांचे सह इतर पत्रकार व महिला पत्रकार उपस्थित होते