खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी डॉ.शबनम शेख यांची पाचव्यादा निवड
बीड/प्रतिनिधी/महान भारत केसरी विजेता, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ.शबनम शेख यांची ५ व्या मध्यप्रदेश (भोपाल)येथे सुरू असलेल्या ५ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला प्रशिक्षकपदी निवड झाली आहे त्यामुळे शबनमचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे
मध्यप्रदेश (भोपाल)येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला व पुरुष कुस्ती संघ सहभागी झाला आहे महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी डॉ. शबनम शब्बीर शेख आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच यांची राज्य शासनातर्फे निवड करण्यात आली विशेष म्हणजे त्या सलग पाचव्यांदा राज्याच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहतील संघाचे प्रशिक्षण शिबिर हे २२ ते ४ जानेवारी बालेवाडी पुणे येथे सुरू आहे. दिल्ली पुणे आसाम पंचकूला हो आता भोपाल सलग त्या महाराष्ट्राच्या संघाच्या चीफ कोच म्हणून कार्य करत आहेत यापुर्वी त्यांनी खेलो इंडिया स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे चॅम्पियनशिप मिळवून दिलेले आहेत त्यामुळेच महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांची निवड केली आहे.या प्रशिक्षणासाठी खास करून जपानचा संघ उपस्थित होतात त्यांना देखील शबनम शेख यांचे मार्गदर्शन लाभले
शेख यांचे बीड अन् अहमदनगर जिल्ह्यातुन सर्व स्तरातून कौतुक केले जात असुन खेलो इंडिया स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत