शहरात केलेल्या विकास कामां मुळेच नागरिकांचा पाठिंबा मिळतोय – डॉ.योगेश क्षीरसागर
दिलावर कॉलनी, गांधी नगर भागातील शेकडो कार्यकर्त्यांचा योगेश पर्वात जाहीर प्रवेश..
बीड दि.31 (प्रतिनिधी)ः- शहरातील तरुणांचा मागील अनेक दिवसांपासून युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा मिळताना पहावयास मिळत आहे. दिलावर कॉलनी, गांधी नगर भागातील अरबाज खान अमजद खान यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अरबाज खान आणि त्यांच्या सहकार्यांचे स्वागत केले. व त्यांनी ज्या-ज्या विकास कामांच्या मुद्द्यावर प्रवेश केला ती कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर बोलताना म्हणाले की, आण्णासाहेब आणि अध्यक्षसाहेब यांच्या माध्यमातून बीड शहरात होत असलेल्या विकासकामांचा वाढता आलेख जनतेसमोर स्पष्ट आहे. काम मंजूर करून आणून ते पूर्ण करण्यापर्यंत आपला हेतू हा विकासाभिमुख राहिला आहे.
लोकांना पण याची हळूहळू जाणीव होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक तरुणांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांनी दाखवलेला हा विश्वासच आगामी काळाची चाहुल देत आहे. माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाची कामे झाली आहेत. तरी देखील विकासाचा राहिलेला अनुशेष लवकरच भरून काढण्यात येईल.
अलीकडच्या काळात या भागाची हद्द मोठ्या प्रमाणात वाढल्याने समस्या देखील वाढल्या आहेत. मात्र या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या-ज्या भागाची हद्द वाढ झाली आहे अशा भागात काम करत असताना रस्ते, नाली, पाणी आणि वीज यांसह इतर समस्या सोडवाव्या लागतात. त्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.
या प्रसंगी अन्वर खान, माजेद कुरेशी, शेख मुजाहीद, शेख जुबेर, साजेद जागीरदार, इम्रान खान, आफताब खान, हुझेब खान, सोनू खान, शेख सलमान, शेख बाबा, सद्दाम मेंबर यांच्यासह अरबाज खान यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.