हैदराबाद येथे तामीर ए मिल्लत तर्फे दोन दिवसीय शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन..
तामीर ए मिल्लत चे अध्यक्ष जियाउद्दीन नय्यर यांच्या अध्यक्षस्थानी..
हैदराबाद , प्रतिनिधी -: हैदराबाद येथे तामीर ए मिल्लत तर्फे दोन दिवसीय शैक्षणिक परिसंवादाचे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात मुस्लिम समाजाने एम पी एस सी, यूपी एस सी सारख्या शिक्षण स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवावे म्हणून संपूर्ण भारत देशातील मोठ मोठ्या शहरात स्पर्धात्मक शिक्षणाचे मार्गदर्शन केंद्र उघडण्यात यावीत असा ठराव घेण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान तामीर ए मिल्लत चे अध्यक्ष जियाउद्दीन नय्यर होते तर या दोन दिवसीय शैक्षणिक परिसंवादात देशभरातून ज्ञानी व शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे अनेक शिक्षण संघटनेचे मान्यवर जण उपस्थित होते.
या कार्यक्रमा साठी बीड जिल्ह्यातील साहित्यिक लेखक सय्यद जकरिया मदनी, सय्यद हसीन अख्तर, मोईन हशर (औरंगाबाद), तनवीर पठाण (नागपूर), नुरोद्दीन इनामदार (पुणे), सोहेल सालेकर (मुंबई), अय्युब शेख (पिंपरी चिंचवड) सह शेकडोंच्या संख्येने गणमान्यांची उपस्थिती होती.