राज्यपाल कोशरींना हटवल्याबद्दल पाटोदात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव
पाटोदा / जावेद शेख, /सातत्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला पादळी तुडवत राष्ट्रपुरुषांना अवमानित करणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विषयी अत्यंत संतप्त भावना सर्वसामान्य जनतेच्या होत्या; ही परिस्थिती लक्षात घेता आज अशा महाराष्ट्र द्वेशी भगतसिंग कोसरींची राज्यपाल पदावरून हकालपट्टी केल्याबद्दल पाटोदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र द्वेषी भगतसिंग कोसरीला राज्यपाल पदावरून हटवल्याबद्दल पाटोदा राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आज शिवाजी महाराज चौक पाटोदा येथे पेढे वाटून आनंद साजरा केला.
“महाराष्ट्रावर सावली नको! “
राज्यपाल भगतसिंग कोसरी यांनी आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या राष्ट्रपुरुषांबद्दल अनुद्गार काढले ही अत्यंत घ्रणास्पद बाब आहे. आज अशा महाराष्ट्र द्वेशी व्यक्तीची हकालपट्टी केल्याने आता महाराष्ट्रावर त्यांची सावली सुद्धा नको.. अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.