जलजिवन मिशन १कोटी ७८ लाख पाण्यातच?मौजे मनूर मध्ये बोगस कामे करणार्या गूत्तेदार व कंञाटदारावर कडक कार्यवाही करा –
अशोक ढगे यांची सिईओकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.
माजलगांव (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यामध्ये तिनचार वर्षे नंतर दूष्काळ पडतोच. या दूष्काळामध्ये या भागातील नागरीकांना पाण्यासाठी विविध समस्येचा सामना करावा लागतो. या सर्व बाबीच्या अनूषंघाने केंद्रशासनाने देशभरामध्ये जलजिवन मोहिम राबवली आहे.त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यात १३६७ कामे चालू आहेत.बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मौजे मनूर येथे, पण १ कोटी ७८ लाखाचे काम कंपनी करत आहे. निव्वळ विहीर अधिग्रहण नाही,फिल्टर अधिग्रहन नाही,२६ जानेवारीच्या ग्रामसभेत अश्वासीत केले नाही की जलजिवन मिशन विषयी माहिती देणं बंधनकारक असतानाही सरळ ग्रामपंचायत ने हात वरी केले आहेत. त्या कामात निव्वळ बोगस पद्धतीने काम होत आहे .
*पाईपलाईन चा चर,खड्डा,बेरींग,हि केवळ १:५ ०२फूट चीच आहे.पाईप खोदण्याचा खड्डा केवळ १:५/ २;५ फूट आहे तसेच पाईप एकदम हलक्या दर्जाचा वापराला आहे .तो उन्हाने व औझ्याने सूद्धा तडकून फूटू शकतो ,पाईप हा केवळ ३ इंचच वापरला असून, पाईपलाईन चा खड्डा सूमारे ०१ मिटर असणं गरजेचं आहे.सबंधित गूत्तेदार हा मनमानी करून आबडधोबड काम उरकून घेण्याच्या तयारीत आहे.*
काम इतके जलद गतीने केले आहे की जशे कोणी मागे लागले आहे. विशेष करून जलजिवन मिशन चे काम अंदाजपञका प्रमाने नसून यात दोषी असणार्यावर कडक कार्यवाही होयलाच हवी,मूख्यकार्यकारी यांच्या दि.२० जाने २३ च्या पञाला ग्रामपंचायतने बगल दिली आहे .निव्वळ मड्यावरच्या टाळुवरचे लोणी खाण्यात सर्वच चांदा ते बांदा मग्न झाले आहेत. अतिशय तळमळीने केंद्राने हे मिशन चालवले असून त्यात गूत्तेदार,व कंञाटदार कंपनी थातूर मातूर कामे करून मलिदा लाटण्याचे पाप करत आहे.संबधित कंञाटदाराचे जो पर्यत या कामाची चौकशी होत नाही तो पर्यत बिले अदा करण्यात येवू नयेत,अशीही मागणी या वेळी करण्यात आली आहे. दरम्यान सढळ कंञाटदार व गूत्तेदार बोगसगीरीत अडकलेले आहेत. त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यूवा अंदोलन व संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक ढगे यांनी प्रकल्प संचालक नवी मूंबई,कार्यकारी अभियंता महाराष्र्ट जिवन प्राधिकरण मूंबई ,विभागीय आयूक्त औरंगाबाद, मूख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पूरवठा बीड तथा प्रकल्प संचालक जिल्हा पाणी पूरवठा स्वच्छता बीड, मूख्यअभियंता महा. जि.प्रा. जि. बीड यांच्याकडे लेखी तक्रारारी निवेदना द्वारे केली आहे.