दूधाळसह भाकड जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे : माजी आदर्श सरपंच श्री. संजय कदम
इसलामपूर ,प्रतिनिधी/इकबाल पीरज़ादे/
दूधाळसह भाकड जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या घरातील गाय, म्हैस तसेच शेळी, बैल या जनावरांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून शेतकरी बांधवांनी वेळीच खबरदारी घेवून शासनाच्या वतीने ज्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत याचा लाभ घ्यावा तसेच जनावरांना देण्यात येणारा चारा, पाणी, वैरण व पशुखाद्य वेळच्या वेळी देवून दुध उत्पादनात भरघोष यश मिळवून आपला प्रपंचा सुखी समाधानी करावा असे मत घबकवाडी गांवचे माजी आदर्श सरपंच श्री. संजय कदम (बापू) यांनी व्यक्त केले.
ते घबकवाडी ता. वाळवा येथील ग्रामपंचायत व राज्य पशू वैद्यकीय दवाखाना रेठरेधरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जनावरांचे वंध्यत्व व तपासणी व उपचार शिबिरामध्ये बोलत होते. शिबीराच्या अध्यस्थानी घबकवाडी गांवच्या लोकनियुक्त सरपंच मा. संगिता माणीकराव घबक ह्या होत्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अजित दत्तात्रय कदम यांनी केले. शिबीराचे उदघाटन गांवच्या लोकनियुक्त सरपंच संगिता माणिकराव घबक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी गावातील ८५ जनावरांची तपासणी करण्यात आली तसेच जनावरांच्या गोट्यात डास, गोचिड होवू नये म्हणून औषधे वाटप करण्यात आली. वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन वंजारे, डॉ. पी. डी. कोळी डॉ. अंबादास माडकर, श्री. संदिप कुंभार, विराट पाटील, कनया खारगे, अमोल काळे, नितीन जाधव, अर्जून मदने, अनिकेत काटवटे, आदी पशुवैद्यकिय विभागातील अधिकारी व स्टाफ यांनी सर्व जनावरांची तपासणी करून उपचार केले.
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित शिबीराचे संयोजन अमित माणीकराव घबक, ग्रामपंचायतचे माजी सदस्य दिपकराव खोत, सुनिल भारती, दिलिप कुंभार, भानुदास कदम, राहूल मुळीक, दत्तात्रय डंगारणे, माणीकराव कदम, प्रताप कदम, सुजल कदम, तुषार खोत यांनी केले. यावेळी गावातील ८५ जनावरांची तपासणी करून उपचार करण्यात आले. शेवटी आभार शंकरराव कदम (नाना)यांनी मानले.