खासदार रजनीताई पाटील यांचे निलंबन तत्काळ मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू – गणेश बजगुडे पाटील

0
91

खासदार रजनीताई पाटील यांचे निलंबन तत्काळ मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू – गणेश बजगुडे पाटील

बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

बीड , प्रतिनिधी/ काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ नेत्या राज्यसभा खासदार रजणीताई अशोकराव पाटील यांच्यावर काल दी. १० फेबुरवरी २०२३ रोजी हेतुपरसपर राज्यसभेचे अध्यक्ष जयदीप धनखड यांनी संसदीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबनाची कारवाई केली असुन ती अतिशय खेदजनक व अन्यायकारक आहे.

उद्योगपती व धनदांडग्यांच्या हिताचे भाजप सरकार गोरगरिबांच्या हिताचे कुठलेही निर्णय घेत नाही याउलट गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या योजना व विकासासाठी संसदेत आवाज उठवणाऱ्या सभागृहातील अनुभवी व ज्येष्ठ सदस्यांवर अशा प्रकारे अधिवेशनाच्या काळात निलंबनाची कारवाई करून आपल्या अकलेची तारे तोडलेली दिसून येत आहे.

आश्या प्रकरची खेदजनक कारवाई पाहण्याची सर्वसामान्यांची ईच्छा आता राहिली नाही म्हणून आज बीड तालुका काँग्रेस कमिटी व शिवक्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. खा. रजनीताई पाटील यांच्या वर केलेली निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घेण्यात यावी नसता रस्त्यावर उतरू असा इशारा काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष तथा शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
गणेश बजगुडे पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील, तालुका उपाध्यक्ष शेख कदर बाबा इनामदार, तालुका सचिव शेख अरबाज, युवक तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, आलम खान पठाण, शेख अरशाद, शेख शौफ, शेख अलीम आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here