AIMIM चा राष्ट्रीय अधिवेशन रमाडा हॉटेल, महापे,नवी मुंबई येथे संपन्न
मुंबई /प्रतिनिधी/दिनांक 25/02/2023 रोजी AIMIM चा राष्ट्रीय अधिवेशन रमाडा हॉटेल, महापे,नवी मुंबई येथे संपन्न झाला या बैठकीस AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी साहेब, महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब तसेच देशभरातील 18 राज्यातील सर्व राज्याचे अध्यक्ष, MLA, MLC व Corporator यांची बैठक झाली.
या बैठकीचे आयोजन हे AIMIM महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी केले होते तसेच या कार्यक्रमास बिलाल जलील साहेब यांची साथ होती. या बैठकीत असदुद्दीन ओवेसी साहेबांनी येणाऱ्या राजकीय घडामोडी बद्दल सर्व सभासदांना मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम होत असताना AIMIM महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शहानवाज खान साहेब यांच्या नेतृत्वात नवी मुंबई विद्यार्थी आघाडी महासचिव समीर शेख व टीम – नाझीम शहा, आरिफ शेख, वसीम शेख व आझाद अन्सारी या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून कार्यक्रमाला संपन्न करण्यास साथ दिली.
तसेच कार्यक्रमाच्या निरोपी वेळीस AIMIM विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष डाॅ कुणाल खरात साहेब,
AIMIM विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान साहेब व AIMIM विद्यार्थी आघाडी नवी मुंबई महासचिव शेख समीर यांनी AIMIM राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी साहेब यांचा सत्कार केला.