तीन वर्षीय चिमूरडी वर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्या..पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर.
बीड/ प्रतिनिधी/मागील काही दिवसापूर्वी बीड शहरात एका तीन वर्षीय चिमूरडी वर झालेल्या अत्याचार प्रकरणी पीडितेस न्याय देत आरोपीस फाशीची शिक्षा देणे बाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक मा. श्री. नंदकुमारजी ठाकूर साहेब यांना आज शिवसंग्रामच्या महिला आघाडीच्या वतिने देन्यात आले.
या प्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष एडवोकेट मनीषाताई कुपकर, सुहास पाटील, शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे, युवा नेते मनोज जाधव, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा, एडवोकेट पूजाताई शहाणे, पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषाताई कोकाटे, शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर, रेखाताई तांबे, गीतांजली डोरले व, अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या सदस्य उपस्थित होत्या..