जय हिंद कॅम्पस येथे किशोरीताई पेडणेकर ,अंकित प्रभू , अनिल कदम यांची सदिच्छा भेट…….
बीड/ प्रतिनिधी/ माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये शिवगर्जना अभियान राबवला जात असून सदरील अभियानामध्ये शिवसेनेचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या परिसरात जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे याच पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुंबईच्या माझी महापौर माननीय किशोरीताई पेडणेकर युवासेना चे कार्यकारी सदस्य माननीय अंकित प्रभू व माजी आमदार अनिल कदम हे माजलगाव या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी बीड शहरामध्ये आले होते
मा.अनिल दादा जगताप यांच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शेख निजाम यांच्या जयहिंद कॅम्पस या शैक्षणिक संकुलाम वर या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली व उपस्थित विद्यार्थ्यांची पालकांची संवाद साधला यावेळी बोलताना माननीय अंकित प्रभू यांनी आपण शालेय जीवनामध्ये कसे प्रयत्न केले व राजकारण व समाजकारण या क्षेत्रामध्ये काम करीत असताना सुद्धा शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले माननीय किशोरीताई यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले व पुढे अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन एक स्वाभिमानी महाराष्ट्र व देश घडवण्यासाठी कार्य करावे असे आवाहन केले यावेळी संस्थेचे सचिव शेख निजाम यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच सत्कार करून आभार मानले