अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन संपन्न
सोयगाव /प्रतिनिधी/ यासीन बेग/ दि.28, शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्याहस्ते रविवार ( दि.26 ) रोजी संपन्न झाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने शहरातील विकास कामांसाठी जवळपास 70 लाख रुपयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने नगर विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या कामात शहरातील तुकाराम शेठ यांच्या गोदामा पासून ते भैरवनाथ बँक पर्यंत गटारी बांधकाम करणे, वॉर्ड क्र.1 मध्ये काँक्रिटीकरण व एकलव्य नगर मध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते तयार करणे,वॉर्ड क्र.2 मध्ये भवानी माता मंदीर ते दत्तू कुंभार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व गटारी बांधकाम करणे, गावातील चौका चौकात बाकडे बसविणे या विकास कामांचा समावेश आहे.