डॉ. फैयाज शेख यांची आयुष भारत असोसिएशनच्या राष्ट्रीय आयुर्वेद सचिव पदी निवड..

0
103

डॉ. फैयाज शेख यांची आयुष भारत असोसिएशनच्या राष्ट्रीय आयुर्वेद सचिव पदी निवड..

 

बीड ,प्रतिनिधी : दि.२८ : आयुष भारत असोसिएशनच्या राष्ट्रीय आयुर्वेद सचिव पदी डॉ. फैयाज शेख यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आमीर मुलाणी यांनी दिली.

हि नियुक्ती राष्ट्रीय सचिव डॉ. आनंद भोसले, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विश्वास वाघमारे, राष्ट्रीय नॅचरोपॅथी सचिव डॉ.जलिल शेख, डॉ. फैयाज शेख, डॉ. तन्वीर देशमुख, डॉ. नामदेव मोरे, डॉ. राजेंद्रकुमार नवले, डॉ. स्वाती राजे मॅडम, डॉ. फैजान इनामदार, डॉ. शाहिन मुलाणी, डॉ. सेंड्रा डिसोझा मॅडम, डॉ. शब्बीर पठाण, डॉ. फिरोज पठाण, तसेच राष्ट्रीय विधी सल्लागार कमिटी, राष्ट्रीय पद नियुक्ती समिती, राष्ट्रीय अॅक्शन फोर कमिटी तसेच सर्व कमिटीच्या सहमतीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी कायद्याविषयी मोफत सल्ला लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत डॉक्टर असोसिएशन / संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे

आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत अॅम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय

 

तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत असोसिएशनचे राष्ट्रीय आयुर्वेद सचिव डॉ. फैयाज शेख यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here