विज्ञान मंडळाच्या वतीने सौ.के.एस.के.महाविद्यालया राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
बीड /प्रतिनिधी/सौ.के.एस.के.महाविद्यालयातील विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिन उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ्.शिवाजी शिंदे यांच्या हस्ते भारतीय वैज्ञानिक सर वेंकट रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ.प्रज्ञा महेशमाळकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला पाहिजे. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात यावे, त्यांना आवड निर्माण व्हावी. विज्ञाना प्रती आकर्षण वाढावे, या हेतूने राष्ट्रीय विज्ञान दिवस रमण प्रभव यांच्या संशोधनामुळे राष्ट्रीय विज्ञान साजरा केला जातो.भौतीकच्या गंभीर विषयावर एक महत्वपूर्ण शोध लावला.पारदर्शी पदार्थातून जाणारा प्रकाश किरणाचा बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला.त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कराने सन्मानीत करण्यात आले.ते अशियातील पहिले व्यक्ती होते.त्यांच्या सन्मानार्थ म्हणून हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.