तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्यात क्षीरसागर यांचे प्रतिपादन..
संभाजीनगर/प्रतिनिधी/प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य व जिल्हा तेली समाज बांधवांच्या वतीने रविवार दि.26 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन दौलत लॉन्स जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले होते. यावेळी मुंबई आणि दिल्ली येथे शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारणार आहे असून ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे, नंदकुमार घोडेले, वैजंती खैरे, अनिल मकरिये, उद्योगपती मनोहर सिंनगारे, राजेंद्र ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, सामाजिक कार्य करत असताना एकत्रितपणे काम करावे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जवाबदारी समाजाची माझ्यावर आहे ती सेवा करण्यासाठी आहे असे मी मानतो. सामाजिक कार्यातून सामन्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून विवाह मेळावा घेणे ही काळाची गरज आहे. ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काही देणे लागतो. मुंबई आणि दिल्ली येथे शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारणार आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज संतान्से, कचरू वेळंजकर, सुरेश कर्डिले, साई शेलार, सोमनाथ सुरडकर, दीपक राऊत, कपिलदेव राऊत, अशोक राऊत, गणेश वाघलव्हाळे, सुदेश लुटे, भिकन राऊत, अक्षय वाघलव्हाळे, सुहास शिंदे आदींनी परिश्रम घेतले.