बीड (प्रतिनिधी) विश्वालय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रभाग क्र.24 मध्ये नगरसेवक रणजित बनसोडे यांनी मोफत आरोग्य तपासनीचे रिपोर्ट प्रभागातील 71 कामगारांना वाटप केले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्वांसाठी नेहमीच प्रभागात मुलभूत उपक्रम राबवण्यासाठी तत्पर असणारे नगरसेवक रणजित बनसोडे यांनी विश्वालय सेवाभावी संस्था तर्फे मोफत एच.बी.रक्तगट आरोग्य तपासनीचे रिपोर्ट प्रभागातील कामगारांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी वाटप केले बनसोडेंच्या या कार्याचे प्रभागातील कामगार वर्गातून कौतुक होत आहे.