दिव्यांगाच्या समस्या सुटल्यातरच जागतीक दिव्यांग दिनाला महत्व आहे – शेख जीलानी
दिव्यांग व्यक्तीना राशान मध्ये अंत्योदय योजनेचा लाभ देण्यांत यावा
पाटोदा (प्रतिनिधी) ३डीसेंबर जागतीक अंपग दिन असुन सर्व शासकीय ,राजकीय लोक आमच्या दिव्यांग बांधवाना आंनदाने शुभेच्छा देतात, पण आमचे दिव्यांग बंधु , भगिनी त्यांच्या अपंगत्वामुळे ज्या वेतना भोगतात त्या त्यांनाच माहित, मी आज जागतीक अंपग दिनानिमित सांगतो माझा दिव्यांग बांधव उपासी आहे शासनाची तुटपुंजी हजार रुपये पेन्शन योजना त्यामध्ये कुटूबांचा उदरनिर्वाह कसा होणार आणि ती पण वेळेवर मिळत नाही , एक हात नाही , पाय नाही , डोळा नाही आशा लोकांनी काय करायचे याचा विचार शासन करत नाही, शासनाने अंपग आर्थिक विकास महामंडळ स्थापण केले व एकदाच बजेट टाकले पुन्हा कधीच टाकले नाही दिव्यांग व्यक्तीला स्वःताचा व्यावसाय करण्यासाठी सध्या कर्ज सुध्दा मिळत नाही .स्थानिकquestions स्वराज्य संस्थेच्या स्वः उत्पन्नातुन दिव्यांग व्यक्तीना पाच टक्के निधी वाटप करा आसे शासन परिपत्रक आहे पण स्थानिक स्वराज्य संस्था सांगते आमच्याकडे वसुली होत नाही त्यामुळे आमच्याकडे स्वः उत्पन्न नाही त्यामुळे आम्ही आपणास निधी देऊ शकत नाही आसे कारणे सांगुन दिव्यांगाना त्यांचा हक्क दिला जात नाही .स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत व्यवसायासाठी गाळे किंवा जागा दिली जाते याची कोणताच अधिकारी दखल घेत नाही तसी तरतुद करत नाहीत
शासन परिपत्रकानुसार दिव्यांग व्यक्तीना राशान मध्ये अंत्योदय योजनेचा लाभ देण्यांत यावा आसे सागितले आहे पंरतु संबधीत अधिकारी म्हणतात सदर राशन कार्ड लग्न झाल्यावरच देता येते आता बोला काय करावे माझ्या दिव्यांग बांधवांनी त्यांना राशन पण अटी देऊनच दिल जातय या सर्व बाबी सुटल्या तरच दिव्यांग दिनाला महत्व आहे