भोकर ( प्रतिनिधी ) शोषित,पिडीत आणि मानवमुक्तीसाठी उभे आयुष्य खर्ची घालून भारतीय नागरीकांना न्याय मिळवून देणारे प्रकांडपंडीत,जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ,कुशल संपादक,समाजससुधारक,सिम्बॉल ऑफ नॉलेज यापेक्षा अनेक बिरूदावली ज्यांना शोभून दिसतात ते मानवमुक्तीचे महानायक विश्वरत्न, यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी ता.(सहा) शहरात विविध ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालूका व शहर शाखा भोकरच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेच्या पूजनेने अभिवादन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी शहरात विविध ठिकाणी पंचशील ध्वजारोहन आणि सायंकाळी पणती ज्योत मिरवणूक काढून महामानवाला अभिवादन करण्यात आले सकाळी दहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूतळ्याच्या जागेवर भारतीय बौद्ध महासभा भोकर शहर शाखा अध्यक्ष साहेबराव मोरे यांच्याहस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले या वेळी भा बौध्द महासभा माजी तालुका अध्यक्ष सि एम कदम यांनी त्रिशरण पंचशिल दिले या नंतर डॉ आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला या प्रसंगी पोलीस निरीक्षक विकास पाटील , अनिल कांबळे , यांच्या सह भा बौ महासभा चे सर्व कार्यकर्ते , एल ए हिरे , मनोज गिमेकर , बि आर पांचाळ ,सुरेश कावळे , एल पी वारघडे ,डॉ साईनाथ वाघमारे ,अॅड प्रमेश्वर पांचाळ ,रमेश गायकवाड ,वंचीत बहुजन आघाडीचे सुनील कांबळे , उ बा ठाकरे शिवसेना चे माधव वडगावकर , सतीष देशमुख , बालाजी गौड पाटील , विक्रम क्षिरसागर , पी पी हनवते , क्षिरसागर ,गौतम कसबे ,दिलीप के.राव, सुलोचनाबाई ढोले, चंद्रकलाबाई गायकवाड, अप्पाराव येरेकर, साईनाथ हामंद, सखाराम वाघमारे, सुभाष तेले, गौतम कसबे, मधुकर गोवंदे, अॅड.भाऊराव कावळे, शाहीर बाबुराव गाडेकर , शिवाजी गायकवाड , श्रीधर घुले , हमीद खा पठान ,संतोष डोंगरे , मनोज शिंदे , संदीप लोमटे , राहुल पाटील ,किरण ढगारे अदिनी मानवमुक्तीच्या महानायकाला त्रिवार अभिवादन केले या वेळी प्रा.गजानन गायकवाड यांनी अभिवादनपर आपले विचार व्यक्त केले