माजी मंत्री क्षीरसागर यांच्या वाढ दिवसा निमित्त दूध संघाच्या वतीने “इन्फंट” संस्थेतील मुलांना उबदार ब्लॅंकेट वाटप
बीड दि.०७(प्रतिनिधी):- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड तालुका दूध संघाच्या वतीने इन्फंट इंडिया या संस्थेतील विद्यार्थ्यांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. याच ठिकाणी माजी मंत्री क्षीरसागर हे दरवर्षी आपली दिवाळी साजरी करत असतात.
बूधवार दिनांक ०७/१२/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या ७२ व्या जन्मदिनानिमित्त बीड तालुका दूध संघाच्या वतीने पाली येथील इन्फंट इंडिया संस्थेतील एचआयव्हीग्रस्त मुलांना थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट व फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगदीश काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती बीड चे माजी सभापती अरुण डाके, केशर मिल्क चे अध्यक्ष नानासाहेब काकडे, मंझरीचे बहिरवाळ महाराज, सखाराम मस्के, ॲड.अंबादास जाधव, तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष मनोजकुमार पाठक, संचालक कुटे महाराज, महेश सिंगण, मुनीर शेख, पालीचे सरपंच दशरथ राऊत व ग्रामस्थ, दूध संघाचे कार्यकारी संचालक संतोष श्रीखंडे व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी इन्फंट इंडियाचे संचालक श्री व सौ बारगजे व विद्यार्थी उपस्थित होते.