दर्गाह हजरत शहेंशाहवली र.जि.बीड.प्रवेशद्वारची…
शाह अल्पसंख्याक संघटना व मुस्लीम बांधवांच्या संयुक्त सहभागातून डागडुजी
बीड (प्रतिनिधी) शहरातील पुरातन वास्तु आणि सर्व समाज बांधवांसाठी प्रार्थनिय असलेले दर्गाह हजरत शहेंशाहवली र.जि.बीड या दर्गाहची प्रवेशद्वारची आज दि.06 डिसेंबर रोजी मुस्लीम बांधवांच्या सहभागातून डागडुजी करण्यात आली यावेळी शाह अल्पसंख्याक संघटनेेचे सचिव शेख अब्दुल कदीर आणि दर्गाचे खादीम फसीयोद्दीन ईनामदार उर्फ राजु ईनामदार यांच्या संयुक्त सहभागातून मुस्लीम बांधवांनी प्रवेशद्वाराची दुरुस्ती केली.
गेल्या अनेक वर्षांपासून या दर्गाहच्य मुख्य प्रवेशद्वाराचा प्रश्न प्रलंबित होता. आज शेख अब्दुल कदीर आणि खादीम फसीयोद्दीन ईनामदार उर्फ राजु ईनामदार यांच्या सहभागातून या वेशीचे पुन्हा एकदा नवे रुप समाज बांधवांना पहायला मिळाले.
शेख अब्दुल कदीर यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचा व सहकार्यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.