ठाकरे गटाचा भगवा फडकला
शिवसैनिकांचा जल्लोष….
बीड, दि.७ (प्रतिनिधी)- होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्य शेवटच्या दिवशी बीड तालुक्यातील भाटसांगवी-औरंगपुरा ग्राम पंचायतवर ठाकरे गटाचा भगवा फडकला. सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या. बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात नवनिर्वाचित सरपंचासह सर्व सदस्यांचा सत्कार केला.
बीड तालुक्यातील भाटसांगवी-औरंगपुरा ग्राम पंचायतच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ग्राम पंचायत बिनविरोध निवडून आली. शाम सुंदर पडुळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा श्रीगणेशा झाला. सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. या निवडीनंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जिल्हा कार्यालयामध्ये नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा सत्कार केला. गोरख चांगण यांची सरपंचपदी निवड झाली. तर किसन बोरवडे, कमलेश बोरवडे, वर्षा राजाभाऊ बोरवडे, मुक्ताबाई शहादेव चादर, अश्विनी गणेश सोनवणे, रामनाथ पडुळे, आशाबाई लहू पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. भाटसांगवी-औरंगपुरा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आणण्यासाठी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शाम सुंदर पडुळे यांच्या नेतृत्वाखाली बबनराव बोरवडे, मदनराव सोनवणे, सारिकराम बोरवडे, वैâलास पडुळे, अंकुशराव बोरवडे, तात्याराव मस्के, श्रीकिसन सोनवणे आदींनी मेहनत घेतली.