महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचं जाहीर निषेध

0
142

महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचं जाहीर निषेध

                                    सईद चाऊस यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून नाव बदनाम करण्याचे षडयंत्र.. गुन्हे तात्काळ मागे घ्या नसता संपूर्ण बीड जिल्ह्यात रस्त्यावर उतरू :- नुमान चाऊस

 

महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या कुस्तीला व त्यांच्या विनम्र स्वभावाला पूर्ण महाराष्ट्र ओळखतो.महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च किताब त्यांनी मिळवला आहे.कुस्ती निवृत्तीनंतर पुण्यासारख्या उद्योग व्यापार विकसनशील शहरात अनेक मार्ग खुले असताना देखील त्यांनी आपल्या जन्मगावी आष्टा येथे शिक्षकाची नोकरी करणे पसंद केले.राजकारणात पदार्पण करण्याची संधी असताना देखील त्यानी आष्टी येथे नवोदित मल्लाना कुस्तीचे ज्ञान देणे पसंद केले.

लहानापासून ते थोरांपर्यंत सर्वाना कधी कटू शब्द न वापरणारे सईद चाऊस यांच्यावर आज गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली आणि अतिशय वाईट वाटले.
तालमील्या मल्लाला का हरवले म्हणून त्यांनी म्हणे चाकु हल्ला केला आणि 10 हजार रु.चोरले.बातमी वाचूनच हसू आले.6 फुटापेक्षा जास्त उंची आणि 100 किलो वजन असणाऱ्या सईद चाऊस यांना एका छोट्या पैलवनावर चाकू हल्ला करायची काय गरज.मागे सरून एक वाजवली तरी पुरेसे होते.पण,आपल्या प्रसार माध्यमांना अश्या नाव असलेल्या लोकांच्या बातम्या ब्रेकिंग news मध्ये दाखवण्याची जणू स्पर्धाच असते.कुस्तीत किती नाव कमावले हे कुठेतरी कोपऱ्यात छापून येईल मात्र असे काही घडले की शहानिशा न करता मोठ्या आशयाच्या बातम्या छापून येतात.पण सईद भाऊ आपल्यासोबत महाराष्ट्रातील तमाम कुस्ती क्षेत्र व आपले चाहते आहेत.आपण लवकरच आपली बाजू निर्भिडपणे प्रसार माध्यमांना सांगा.आपण आजवर केलेले निस्वार्थ व निरपेक्ष कार्य समाज माध्यमांसमोर आणावे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here