जिल्हा कुमार कुमारी खो-खो संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना
बीड – : जिल्हा खो-खो असोसिएशनचे वय वर्ष 18 आतील मुला मुलीचे संघ नुकतेच राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी बीड येथून रवाना झाले. ही स्पर्धा महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथे संपन्न होत असून या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचे कुमार कुमारी खो-खो संघ बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्य स्पर्धेसाठी करत आहेत या स्पर्धेसाठी या संघाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून प्रसीद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सौ सारिकाताई क्षीरसागर यांनी दोन्ही संघाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपल्या खेळीचे कौशल्य पणाला लावून जिल्ह्याचे, आपल्या शाळा महाविद्यालयाचे व आई-वडिलांचे नाव उंच व्हावे असे शुभेच्छा पर खेळाडूंना संबोधित केले. सरिका ताई यांनी संघास गणवेश प्रदान करून शुभेच्छा दिल्या. या संघाला राष्ट्रीय खेळाडू कु. वौष्णवी बन तर मुलाच्या संघाला राष्ट्रीय खेळाडू संदीप खांडे हे या संघाचे नेतृत्व करत असून या संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रा. डॉ. तानाजी आगळे व सौ. प्रा. चित्राताई आगळे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून मुली संघाला भागवत ठाकरे सर तर संघ व्यवस्थापिका म्हणून मनीषा थोरात मॅडम तर मुले संघाला प्रशिक्षक म्हणून विद्यापीठ राज्य खेळाडू श्री. सुधीर हजारे तर संघ व्यवस्थापक म्हणून विद्यापीठ खो-खो खेळाडू सोमीनाथ मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संघातील 15 मुली खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे
1) बन वैष्णवी (कर्णधार)
2) गिरी अंकिता
3) जाधव स्नेहा
4) जाधव ऋतुजा
5) शिंदे वैष्णवी
6) नरवडे ऋतुजा
7) कुंभार शुभांगी
8) गुंड अपूर्वा
9) धिवारे उत्कर्षा
10) पंडित वैष्णवी
11) फुलमाळी रेश्मा
12) वीर शिवानी
13) मेरड अश्विनी
14) दिवटे रेणुका
15) खाडे आरती
तर 15 मुले खेळाडूंची नावे
1) खांडे संदीप (कर्णधार)
2) हराळे ओंकार
3) लाटे रोहन
4) तुपे प्रताप
5) पांढरे प्रवीण
6) पांढरे अरविंद
7) शेख अबूबकर
8) घोलप सार्थक
9) आगळे अंकित
10) दाभाडे शिवदत्त
11) घोलप समर्थ
12) हिवाळे अभिषेक
13) धनुरे संकेत
14) आवारे अजय
15) गिरी रितेश
या बीड जिल्हा कुमार कुमारी संघास बीड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर तसेच कार्याध्यक्ष प्रा. जनार्दन शेळकेसर सरचिटणीस प्रा. डॉ. तानाजी आगळे प्रा. सौ. चित्राताई आगळे, उपप्राचार्य डॉ. किशोर मचाले, प्रा. अंकुश गव्हाणे, श्री राम प्रभू काकडे, श्री. वसंत जाधव सर, सौ. रोहिणी जाधव मॅडम आजी-माजी सर्व सीनियर खेळाडूंनी यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या