बीड येथे होणाऱ्या इज्तेमासाठी जादा बसेस सोडा – : नुमान चाऊस

0
132

बीड येथे होणाऱ्या इज्तेमासाठी जादा बसेस सोडा- : नुमान चाऊस

 

सविस्तर माहिती अशी की, दिनांक 8 9 डिसेंबर रोजी बालेपीर, नगर रोड, बीड येथे मुस्लिम समाजाचा जिल्हास्तरीय इज्तेमा (धार्मिक कार्यक्रम) होणार आहे. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून व गावातून हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव तिथे पोहोचणार आहेत.

 

मानवतेच्या कल्याणासाठी लोकांनी स्वतःची वागणूक चांगली करावी तसेच अन्य समाज प्रबोधनाचे व्याख्यान तिथे होणार आहेत. मुस्लिम बांधव आपापल्या परीने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी मोटरसायकलवर, कोणी कार, जीप मधून तर कोणी एसटी बसेस मधून तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. यातच एसटी महामंडळाला जास्त प्रवासी आकर्षित करून एसटी बसच्या जास्त फेऱ्या वाढवुन, उत्पन्नात वाढ करण्याची संधी आहे. तसेच एसटीचा प्रवास हा सुखाचा प्रवास मानला जातो. म्हणून जास्तीत जास्त बांधवांनी एसटीतून प्रवास करावा हा प्रयत्न परिवहन महामंडळाने करावा.

म्हणून इज्तेमासाठी माजलगाव आगारातून बीड साठी एसटी बसेस च्या जास्तीत जास्त फेऱ्या सुरू करण्यात यावे या मागणीसाठी मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस, युवक तालुका अध्यक्ष वाजिद शेख व आदी यांनी माजलगाव आगार प्रमुख यांना निवेदन देऊन ही मागणी केली

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here