गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न
गेवराई -: उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश शिंदे व नेत्ररोग तज्ञ डॉ- जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र रोग तपासणी करण्यात आली.
यावेळी नेत्रदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांवर औषधोपचार व 12 विद्यार्थ्याचे चष्मय्यांचे नंबर काढण्यात आले. गंभीर नेत्रदोष असलेल्या 2 विद्यार्थ्यावर औरंगाबाद येथे शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित नेत्र चिकित्सक जिवन काळे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, डॉ. आंधळे, डॉ. मिसाऴ, डॉ सय्यद, डॉ. सावंत, डॉ पवार, डॉ घोक्षे तसेच अधिपरिचारीका श्रीमती झगडे,बनसोडे तसेच आरोग्य कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते