महाराष्ट्र राज्य साखर संघ मुंबईच्या अध्यक्ष पदी. पी आर पाटील(दादा) यांची बिनविरोध निवड..

0
122

राजारामबापू कारखाना राजारामनगरचे अध्यक्ष पी आर पाटील(दादा) यांची महाराष्ट्र राज्य साखर संघ मुंबईच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

 

इसलामपूर ,प्रतिनिधी-:इकबाल पीरज़ादे
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि.,राजारामनगर (साखराळे) चे अध्यक्ष,राज्याच्या सहकारी क्षेत्रातील जेष्ठ नेते पी.आर.पाटील (दादा) यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ,मुंबईच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी लोकनेते सुंदररावजी सोळंकी सहकारी साखर कारखाना,माजलगावचे अध्यक्ष,माजी मंत्री प्रकाशराव सुंदररावजी सोळंकी व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप पुंजाजी ओहोळ या दोघांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात आल्या.
माजी उपमुख्यमंत्री,विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,नॅशनल फेडरेशन,दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भगतदादा पाटील,सौ.शैलजादेवी जयंतराव पाटील,आ.मानसिंगभाऊ नाईक,आ. मोहन राव कदम यांच्यासह असंख्य मान्यवर व कार्यकर्त्यांनी पी.आर दादा व उपाध्यक्षांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुंबई येथे निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई नगरीचे उपनिबंधक पी.डी.पाटील यांच्या अध्यक्षते खाली नूतन संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत स्व.विलासराव देशमुख सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब मोहनराव पाटील यांनी अध्यक्षपदासाठी पी.आर. दादांचे नांव सुचविले,त्यास नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना,शहाजीनगरचे अध्यक्ष,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनुमोदन दिले. बैठकीस माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,माजी मंत्री प्रकाश आवाडे,माजी आ.नरेंद्र घुले-पाटील, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढाचे अध्यक्ष,आ.बबनराव शिंदे (दादा),संत कूर्मदास सहकारी साखर कारखाना, सोलापूर चे अध्यक्ष धनाजी साठे,छ.शाहू सहकारी साखर कारखाना,कागलच्या अध्यक्षा सुवासिनी विक्रमसिंह घाडगे,अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा रश्मीताई बागल यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

 

राष्ट्रीय नेते खा.पवारसाहेब यांची घोषणा आणि दादांची निवड।।
पी.आर.दादा हे राज्यातील सहकारी साखर क्षेत्रातील सर्वात जेष्ठ व जाणते नेते आहेत. ते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ५४ वर्षे संचालक आहेत. त्यातील एक वर्ष उपाध्यक्ष,तर सलग २९ वर्षे अध्यक्ष आहेत. दोन वर्षापूर्वी त्यांचा राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कुरळप येथे अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला होता. या समारंभातच पवारसाहेबांनी दादांची अध्यक्षपदी घोषणा केली होती. मात्र मध्यंतरी कोरोनाचे संकट आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने ही निवड लांबली होती. आजच्या निवडीने पवारसाहेबांनी दिलेला शब्द खरा केल्याची भावना वाळवा तालुक्यात व्यक्त करण्यात येत आहे.

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९६७ साली पी.आर.दादांची वयाच्या २४ व्या वर्षी कुरळप जिल्हा परिषद मतदारसंघा तून उमेदवारी जाहीर करून विजयी केले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी तत्कालीन वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या शासन नियुक्त संचालक मंडळात संचालक म्हणून निवड केली होती. त्यांनी १९८६ ते ९६ सलग १० वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून जबाबदारी पाहिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर
प्रत्यक्ष सदिच्छा भेट।।
राष्ट्रीय नेते खा.पवारसाहेबांनी संधी दिली असून या संधीचे सोने करू. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व सदिच्छा माझ्यासमवेत कायमच आहेत. सध्या आमच्या कुरळप गावासह तालुक्यात,जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आपण सर्वजणच प्रचारात व्यस्त आहोत. ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतर आम्ही आपणा सर्वांना कुरळपला निमंत्रित करणार आहोत. त्यामुळे कार्यकर्ते व हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यास धावाधाव न करता,प्रचारात कायम राहावे,असे आवाहन पी.आर.दादांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here