११ डिसेंबर रोजी खोपोलीत प्रा. प्रवीणकुमार सरांकडून , परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार एक्झाम इज फन चे धडे…
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) खोपोलीतील नामांकीत असलेले प्रवीणकुमार सरांचे यश एजुकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे मिळणार आयुष्यातली कोणतीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षा एक गंमतीदार खेळ आहे तो कसा यशस्वीपणे खेळायचा आणि विजयी व्हायचे यांचे प्रात्यक्षिकासह मिळणार अभ्यासतंत्राचे धडे.
यामध्ये अनुभवणार , परीक्षेचे महत्वाचे चार नियम , परीक्षेची पूर्व तयारी (मानसिक व शारीरिक ), पेपरच्या आदल्या दिवसांची तयारी , पेपरच्या दिवशी तयारी , पेपरच्या अर्धा तास अगोदर , पेपर लिहिताना , पेपर सुटल्यावर , शिक्षणाच्या पद्धती , मेंदूची क्षमता व कार्य , परीक्षा व अभ्यासतंत्र ,परिक्षा काळातील आहार , परिक्षा काळातील व्यायाम , परिक्षा व वेळेचे व्यवस्थापन , परीक्षा व झोपेचे व्यवस्थापन. ..
परिक्षा व ध्येय – पाठांतर न करता लक्षात कसे ठेवावे. परिक्षा काळात येणाऱ्या अडचणी (अंतर्गत व बाह्य ) व उपाय. परीक्षेच्या ताण तणाव पासून मुक्त होण्यासाठी काय करावे.
फायदे – परीक्षेतील गुणांमध्ये वाढ होईल. परीक्षेच्या ताण तनावातुन मुक्तता. परीक्षेच्या भीती पासून मुक्तता. परिक्षा मौज वाटेल. मेंदूचे कार्य व क्षमता समजल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. परीक्षेतील व जीवनातील अडचणींवर मात करता येईल.
इयत्ता आठवी पासून पुढे दहावी ,बारावी , कोणत्याही शाखेचे पदवीस बसलेले , एम पी एस सी , यू पी एस सी , बेंकिंग , रेल्वे , पोलीस भरती आदी प्रकारच्या परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीसाठी अत्यंत उपयोगी हा उपक्रम आहे. हे पहा अनुभवा आणि मनातील भीती दूर करण्याकरीता रविवार दिनांक – 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत रायगड जिल्यातिल आणि रायगडला लागून असलेल्या जिल्ह्यातील मुलांनी 8857003232 / 7709374415 या नंबर वर संपर्क साधून पास घ्यावेत. असे आवाहन यश क्लासच्या वतीने करण्यात आले आहे.
यश क्लासने आदिवाशी आश्रम शाळा आणि समाजातील आर्थिक गरीब मुलांसाठी मोफत तथा फ्री मध्ये उपक्रम राबवुन सर्वोतोपरि मदत करीत आहेत.