राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चिंता करू नये असे मत  डोंगरकिनी गटाचे युवानेते मधुकर येवले

0
125

डोंगरकिनी मधील स्वयंभू नेतृत्वाला कोणी फॉर्म माघारी घेण्यासाठी कोणी विचारणामुळे तो भि..चोट राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीला सोशल मीडियाद्वारे बदनाम करत आहे – मधुकर येवले

पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील राजकारणात अतिशय महत्त्वाचे गाव म्हणून ओळख असलेल्या डोंगरकिनी या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होवावा म्हणून सर्वच पक्षातील नेते मंडळी व गावकरी नागरिक एकत्र आले. याला कारणही तितकेच महत्त्वाचे आहे

कारण ग्रामपंचायत निवडणूकी मधे भावाभावात भावकी वादात गावातील नागरिक एकमेकापासून कायमचे लांब जातात यामुळे गावात शांतता राहावी गावातील सर्व नागरिक गुण्या गोविंदाने एकत्र रहावे म्हणून सर्व पुढारी मंडळी एकत्र येऊन गावात शांतता रहावी म्हणून प्रयत्न करत होते मात्र ह्याला पहावे तेवढे यश आले नाही म्हणून ज्यांना आपल्या गावात शांतता पाहिजे असे लोक पक्ष वाद सोडून एकत्र आले व एकत्र येऊन पॕनल तयार केला ही बाब काही विघ्न संतोषी लोकांना खटकल्यामुळे त्यांनी सोशल मिडीयाद्वारे आमदार आजबे यांचे डोंगरकिनी गटात काही अस्तित्व राहिले नाही अशी विनोदी पोस्ट केली याचे कारणही तेवढे महत्त्वाचे आहे संबंधित स्वयंघोषित नेतृत्व हा कोणत्या लायकीचा आहे

 सर्व गावकर्याना माहिती असल्यामुळे त्या नेत्याला कोणी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी विचारले नाही व समोरील उमेदवारानी स्वयंघोषित नेतृत्वाला कवडीची ही किंमत दिली नसल्यामुळे ते महाशेय सोशल मीडिया द्वारे काहीही पोस्ट करू लागले अशांनी आधी आपल्या घराचे पाहावे त्यांनी लोकनेते आमदार बाळासाहेब आजवे काका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चिंता करू नये असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डोंगरकिनी गटाचे युवानेते मधुकर येवले यांनी व्यक्त केले आहे

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here