बीड शहरातील फुलांचे सुप्रसिध्द व्यापारी बंडु फुलारी यांचे अल्पशा आजाराने निधन
बीड दि.12 (प्रतिनिधी) – शहरातील फुलांचे सुप्रसिध्द व्यापारी बंडु फुलारी (दिलीप सुदामराव गुगळे) यांचे दि. 11 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.बीड शहरातील सुप्रसिध्द फुलांचे व्यापारी तसेच फुलांच्या वैभवात भर घालणारे लग्नकार्य, वाढदिवस, मंदिर सजावट किंवा राजकिय लोकांच्या सभा असुन त्यासाठी लागणारे फुलांचे साहित्य हार डेकोरेशन म्हणलं तर एकच नाव समोर यायच ते म्हणजे बंडु फुलारी. आपल्या हस्तकलेतुन फुलांच्या जगतामध्ये त्यांनी आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती.
गेल्या महिन्याभरापासुन त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्यावर गुजरात येथील बडोदा या ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दि. 11/12/2022 रोजी त्यांची प्राण ज्योत मालवली.ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर होते. बीड शहरातील कोष्टी समाज बीडचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक बहिण, दोन मुले, दोन मुली तसेच सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर, नातेवाईकांवर, मित्र परिवारावर दुःखाचा डोंगरे कोसळला आहे. त्यांच्या दुःखात सर्व मित्र परिवार सहभागी आहे.