पै.कु.शबनम शब्बीर शेख यांनी रोवला कर्जत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
136

पै.कु.शबनम शब्बीर शेख यांनी रोवला कर्जत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुराा..

 

औरंगाबाद /प्रतिनिधी. पै शबनम शेख या भारतातील प्रथम महिला ठरल्या आहेत की ज्यांनी “कुस्ती” या खेळात पीएच.डी(डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली व ही पदवी प्राप्त करणाऱ्या एकमेव Youngest woman कुस्तीगीर  आहेत तसेच त्या आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच सुद्धा आहेत .म्हणजेच कालपर्यंत ज्यांना पै शबनम शेख म्हणून ओळखले जायचे त्यांना आजपासून पै.डॉ.शबनम शेख म्हणून ओळखले जाणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागात , शबनम शब्बीर शेख यांना पीएच.डी.(Ph.D) पदवी प्रदान केली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी महिला कुस्ती खेळाडूंच्या भावनिक परिपक्वतेचा तुलनात्मक अभ्यास” या विषयावर सखोल अभ्यास आणि संशोधन करून पीएच.डी. चा अभ्यासक्रम पूर्ण केला.या अभ्यासक्रमात त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना शरदचंद्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.साजिद अमर चाऊस यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सोबतच कुस्तीतील भीष्माचार्य डॉ.जबर सिंग सोम, डॉ.विनय पवार, डॉ.डि.के.कांबळे, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.आताऊल्ला जहागीरदार, डॉ.कल्पना झरेकर, मेजर शब्बीर शेख, रिझवाना शेख,आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील, डॉ.उषाताई तनपुरे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here