श्री संताजी आर्ट गॅलरीचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न
अखिल भारतीय तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
बीड, प्रतिनिधी- : आज नागपूर येथे श्री संताजी स्मारक समिती नागपूर व एन आय टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 6 कोटी 23 लक्ष खर्चाच्या श्री संताजी आर्ट गॅलरीचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अखिल भारतीय तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
यावेळी माजी मंत्री क्षीरसागर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्म गावी सदूंबरे जि पुणे येथील 63 कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रस्ताव मंजूर करावा अशी प्रमुख मागणी करताच राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसातच हा प्रस्ताव मंजूर करू असे आश्वासन दिले.या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ. अभिजीत वंजारी, आ.कृष्णाजी खोपडे, शेखर सावरबांधे, आयुक्त मनोज सूर्यवंशी, आ.मोहन मते,माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.