ढिसलेवाडी आणि वांगी दोन्ही साठवण तलावाची स्थगिती उठवण्यास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश..
बीड दि.26 (प्रतिनिधी)-शिरूर तालुक्यातील रायमोह सह येवलवाडी, वंजारवाडी, सांगळवाडी डोळेवाडी ढिसलेवाडी दत्तनगर आणि बीड तालुक्यातील वांगी गावचा सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश आले असून यासाठी निविदा प्रसिध्द झाली आहे
साठवण तलाव ढिसलेवाडी 5.90 कोटी तर वांगीसाठी 3.51 कोटी रुपयांची पुर्नर निविदा प्रकाशित.
साठवण तलाव ढिसलेवाडी शिरूर तालुका जिल्हा बीड 1323 टिसीएम( सहस्त्र घनमीटर) एवढा पाणीसाठा असलेल्या या तलावाचे वैशिष्ट्ये म्हणजे संपूर्ण तलाव हा माती कामाने होणार आहे. सदरील योजना गोदावरी खोरे उपखोरे सिंदफणा नदी असे प्रस्तावित होते . या योजनेस जलसंपदा विभाग मार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2010 रोजी 1.08 एम.सी.यु.एम.पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले होते.
जिल्हा जलसंधारण अधिकारी बीड दि.06 जुलै 2019 आणि प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग औरंगाबाद यांनी दि.03 ऑगस्ट 2019 ला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मागणीनुसार जलसंधारण महामंडळ कार्यालयामार्फत प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्याकडे सादर केले होते.
2019 मध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री पदाच्या काळामध्ये शिरूर तालुक्यात 33, बीड तालुक्यात 11 असे एकूण 45 कोटी रुपयांची 44 कोल्हापुरी बंधारे मंजूर करून घेतले होते. ज्याची कामे आता पूर्ण झाली असून त्यांची एकूण साठवण क्षमता 3600 टीसीएम ( सहस्त्र घनमीटर) एवढी होत असून सिंचन क्षेत्र 1100 हेक्टर म्हणजे 2750 एकर एवढे होत आहे.