कौशल्याला कोण्या पदवीची गरज नसते -: “स्पोर्टस्बाईक निर्माण” -: शेख.सोहेल फत्तेहमोहम्मद .नागपुर
नागपुर येथील जाफर नगर मध्ये राहणार्या शेख_सोहेल_फत्तेहमोहम्मद या युवकांने स्क्रॅप स्टील (भंगारितुन) चा उपयोग करुन स्पोर्ट्स बाईक निर्मिती केली आहे.
सोहेल शेख चे वडील शेख फत्तेमोहम्मद हे ट्रक ड्रायव्हर असुन परिवाराचा उदर्निरवाह चालवण्यासाठी परिश्रम घेत आहे. दहावी नापास असलेल्या सोहेलला आपल्या कौशल्याचा मेहनतीवर एक स्पोर्टस् बाईक तयार करण्यात यश आले आहे.
गरिब परिस्थिती मुळे शिक्षण हुकले, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने या बाईक बनवायचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी लागणारे दहा हजाराचे साहित्य जमा करण्यापायी तब्बल दिड वर्ष एक होटल मधे काम करावे लागले हा जिद्दीचा संघर्ष इतरांना नक्कीच विचार करण्यास प्रवृत्त करण्यास मदत करेल.
पैशे जमा झाल्यावर दोन महिन्यात स्पोर्ट बाईक तयार केली,त्याची ट्रायल घेतली तर एक लिटर पेट्रोल मध्ये हि स्पोर्टस् बाईक पंचवीस किलोमीटर धावते अशी खाञी करुन त्याची प्रसिद्धी केली स्थानिक वृत्तञांनी त्याच्या उपक्रमाची दखल घेतली.
जमात ए इस्लामी हिंद च्या महाराष्ट्र युवक विंग तर्फे आमखास मैदान औरंगाबाद येथे आयोजित एकदिवसीय बिझनेज एक्सपो ( business expo) मध्ये शेख_सोहेल_फत्तेहमोहम्मद च्या स्पोर्टस् बाईक ला प्रदर्शन मध्ये जागा मिळाली व सोहेल च्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
कौशल्याला कोण्या पदवीची गरज नसते हि वाक्य सोहेल मुळे पुन्हा प्रकाशात आली.
आपल्या अवती भवती शिक्षण घेणारे अथवा शिक्षण पुर्ण ना झालेले अनेक कौशल्यवान तरुण आढळून येतील प्रसंगी त्यांना योग्य मदत मिळाली तर नक्कीच समाजाची उंचावतील.
भंगार गोळा करणारा मोठा वर्ग समाजात आहे परंतु गोळा केलेल्या भंगाराचे रिसायक्लींग ( recycling factory) कंपनी नाही.
सोहेल चे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्