बेकायदा दारु विक्री; मद्य पान करणारासह हाँटेल चालकास दंड

0
109

बेकायदा दारु विक्री; मद्य पान करणारासह हाँटेल चालकास दंड

 

माजलगाव-(प्रतिनिधी)तालुक्यातील सावरगाव येथील बेकायदा दारु विक्री करणाऱ्या हाँटेल चालकास माजलगाव येथील कोर्टाने 30 हजार रुपये दंड तर दारु पिणार्या दोघा ग्राहकास 1हजार रुपये दंड ठोठावला आहे.

सावरगाव येथील शिवराज हॉटेलचा चालक राजेश सुधाकर नाईकनवरे याने आपल्या हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना विनापरवाना मद्यसेवनास अवैद्य परवानगी देत असतात अशी खात्री लायक खबर मिळाल्यावरुन 21 डिसेंबर रोजी . जी . एन . गुरव , निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क , अंबाजोगाई यांचा सर्व स्टाफ , दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , अंबाजोगाई यांचा सर्व स्टाफ व दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , माजलगाव यांचा सर्व स्टाफ यांच्या पथकाने सदरील हॉटेल वर गुन्हे कामी छापा घातला असता

 

हॉटेल चालक राजेश सुधाकर नाईकनवरे , वय : 27 वर्ष , धंदा : हॉटेल मालक , रा . सावरगाव ता . माजलगाव जि . बीड याने अवैधरित्या कोणताही कायदेशीर परवाना नसताना सदरील हॉटेल मध्ये एकूण 02 ग्राहक दारू पितांना आढळून आल्याने सदर ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 68 ( अ ) ( ब ) 84 अन्वये गुन्हा नोंदवून इतर मद्य सेवन करणारे एकूण 02 ग्राहक इसम व हॉटेल चालक असे एकूण 03 इसमां विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता

 

सदरील गुन्ह्याचे अंतिम आरोप पत्र निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई यांनी दिनांक 22.12.2022 रोजी गुन्ह्याचे मूळ दोषारोप पत्रासह 03 आरोपींना मा . न्यायालय माजलगाव येथे हजर केले असता मा न्यायालयाने मद्य सेवन करणाऱ्या एकूण 02 इसमांना प्रत्येकी रु . 1000 / – व हॉटेल मालकास रु .30000 / – असा एकूण 32000 / – दंड ठोठावला . सदरील कारवाई हि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे औरंगाबाद विभागाचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शना खाली अभिजीत देशमुख प्र . अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क , बीड यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक श्री गुरव जी.एन. दुय्यम निरीक्षक श्री . आर . के . बागवान अंबाजोगाई . दुय्यम निरीक्षक श्री खाडे माजलगाव व इतर सर्व स्टाफ यांनी सदरील कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here