अलौकिक व्यक्तिमत्व प्रशासक म्हणून लाभल्या हे बीडचे सौभाग्य :- माजी जिल्हाधिकारी डॉ.भारत सासणे
सेवा गौरव समारंभ आणि साहित्य महोत्सवाचे शानदार उदघाटन संपन्न
बीड/प्रतिनिधी/अलौकिक व्यक्तिमत्व प्रशासक म्हणून लाभल्या हे बीडचे सौभाग्य आहे. शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात बिडकरांच्या इतिहासात नोंद राहील अशी कामगिरी डॉ दीपा क्षीरसागर यांनी केली. बीड जिल्ह्याचा कार्यकाळ अविस्मरणीय असा राहिला, बीड जिल्ह्याने त्याचे वेगळे पण कायम सिद्ध केले आहे बीडच्या इतिहासात दीपा ताईंच्या कर्तृत्वचा ठसा हा लक्ष्मी सरस्वतीच्या संगमाने लाभलेल्या आशीर्वादासम आहे. असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी जेष्ठ साहित्यिक डॉ.भारत सासणे यांनी केले. ते सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा सुप्रसिध्द् लेखिका डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या सेवागौरव व साहित्य महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर, न.शि.सं.राजुरी नवगणचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उत्सवमुर्ती प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, वृत्त निवेदक, कलाकार ज्योती आंबेकर , युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, काकू नाना, कवियत्री स्व सुहासिनी इर्लेकर व स्व यशवंतराव इर्लेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी दीपस्तंभ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उपप्राचार्य संजय पाटील म्हणाले की,डॉ. दीपाताई निवृत्त होऊ शकतात ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. डॉ दीपाताईंच्या सेवा निवृतीचा उत्सव व्हावा ही कॉलेजमधल्या प्रत्येकाची इच्छा होती आणि त्याना सरप्राईज देण्यासाठी त्याच्या नकळत हा सेवा गौरव समारंभ आयोजित केला असल्याचे उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर यांनी सांगितले .
क्षीरसागर घराण्याची कर्तबगारपणा जोपसण्याचे कार्य दीपा ताईंनी केले, कर्तृत्वाने प्रगल्भ असतानाही प्रत्येक व्यक्तीला मनसन्मान देणे ही वृत्ती ताईंच्या अंगी आहे, महाविद्यालयच्या प्राचार्य दीपाताई असणे म्हणजे सुरक्षितेची भावना मुलींच्या मनात तयार होते , ताईंबद्दल खुप काही आठवणी आहेत प्रत्येक गोष्टीतून त्याच्यातील ऋजुता ओझरते असे मत वृत्त निवेदक, कलाकार ज्योती आंबेकर यांनी व्यक्त केले.
तर बीडच्या संस्कृतीक वैभवात भर टाकण्याचे काम दीपा ताईंनी केले असे मत अभिनेते डॉ.राजु पाटोदकर यांनी व्यक्त केले, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ दीपाताईंच्या सहवासात काम करताना प्रशासक हा दीपा ताईंसारखा असावा असे मत प्रा. सत्येनंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
दीपाताईनं सारखा प्रशासक असेल तर उत्तम प्रशासक तयार होईल, ताईंच्या मार्गदर्शनाने देशातील उत्तमोत्तम क्षेत्रात महाविद्यालयाचे विद्यार्थी आज आहेत असे मत उप प्राचार्य सय्यद लाल यांनी व्यक्त केले. प्रकृती अस्वस्त्यामुळे मला यायला जमलं नाही मात्र घरच्यां कार्यक्रमात मला हक्काने बोलविले यातच बीडच्या मायेची ओल जाणवते. दीपाईच्या बद्दल बोलताना त्याच्या ठायी असलेल्या माणुसकी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वचे दर्शन होते, चौफरे भरारी घेऊन ही जमिनीवर पाय असणारे व्यक्तिमत्व म्हणजे दीपाताई शिरसागर असे व्हिडीओ द्वारे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
ज्योती अंबेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बहुचर्चित नरहर कुरूंदकर प्रस्तृत एका विचारवंताची अपरिचित गोष्ट या साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले, या अभिवाचनाला अजय आंबेकर, ज्योती आंबेकर, दिलीप पाध्ये, विश्वास आंबेकर, ज्योती पाध्ये, शुभंकर देशपांडे यांच्या सह मुंबई आणि मराठवाड्यातील प्रतिथयश कलावंत आणि तंत्रज्ञ लक्ष्मीकांत दोडके, सतीश मस्के, ईश्वर मचकटकर, शेख अमजद हे लाभले. आभार प्रदर्शन प्रभारी प्राचार्य शिवानंद क्षीरसागर तर सूत्रसंचालन अभिनेत्री डॉ उज्वला वणवे यांनी केले.
कार्यक्रमास क्षीरसागर कुटुंबातील सर्व सदस्य, महाविद्यालयातील तसेच संस्थेतील सदस्य, शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी होजागिरी हे सांस्कृतिक नृत्य सादर झाले, जेष्ठ साहित्यिक विद्यासागर पाटांगणकर, सेवा गौरव समितीचे सदस्य राजेंद्र मुनोत, संपादक दिलीप खिस्ती, प्रभारी प्राचार्य शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर, उप प्राचार्य सय्यद लाल, प्राचार्य डॉ. राजपानगे, प्राचार्य आबासाहेब हांगे, उप प्राचार्य विलास भिल्लारे, प्रा.सतीश माउलगे, प्रा. विश्वास कंधारे, प्राचार्य काळे, प्रा.जालिंदर कोळेकर यांच्या सह शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.