कुरळप ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ताधारी पराभूत, युवक क्रांति पॅनेलची एक हाथीसत्ता, 38 वर्षाची मजबूत सत्ता पैलवान अशोक पाटील यानी ऊलथून टाकली
इसलामपूर दि (प्रतिनिधी)इकबाल पीरज़ादे
अत्यन्त लक्षवेधी ठरलेल्या व गेल्या ३८ वर्षांपासून कुरळप ता वाळवा येथील ग्रामपंचायतीवरील राज्य सहकारी साखर संघाच्या पी आर पाटील यांच्या सत्तेचा दारुण पराभव झाला . पै अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाने एकहाती सत्ता काबीज केली व सत्ताधारी गटाला धोबीपछाड केले .
संपूर्ण राजकीय क्षेत्रातील मान्यवर लोकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते . ही निवडणूक पै अशोक पाटील विरुद्ध पी आर पाटील अशीच अत्यंत अटीतटीची झली होती . ३८ वरश्याच्या सत्तेला काही महिन्यांपूर्वी अशोक पाटील यांनी पोटणीवडणुकीत खिंडार पाडले होते . आज पूर्ण सत्ताच काबीज करीत पी आर पाटील यांच्या ताब्यातील ग्रामपंचायत आपल्या कडे घेतली . कार्यकर्त्यांनी गुलाल व फटक्यांची आतिषबाजी केल्याने गावातील मुख्य रस्ते गुलाल मय झाले होते . ११/५ असा विजय मिळवून युवक क्रांती पॅनल ने सत्ताधारी गटाचा धुव्वा उडवला.
कुरळप ता वाळवा येथे ग्रामपंचायत निवडणूकित युवक क्रांतीच्या डॉ मदन शेटे यांनी ३८१ मताधिक्य मिळवत पी आर पाटील गटाच्या जोतिराम माळी यांचा पराभव करीत सरपंच पदाला गवसणी घातली . कुरळप ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य साखर संघाचे पी आर पाटील यांचा करिष्मा दिसून आलेला नाही. गेल्या चार दशकापासून विरोधी गट सत्तेसाठी लढत होता. मात्र विरोधी गटाला कमकुवत बनवत पी आर पाटील गटाने ग्रामपंचायत कारभाराची सूत्रे आपल्याच हातात ठेवली .गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायत निवडणूकीची तयारी अत्यन्त जोमाने सुरू होती. या निवडणूकीच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत केलेल्या खालच्या दर्जाच्या टिकेने विरोधी गटाचा विजय सुकर झाला असल्याची मते ग्रामस्ततून व्यक्त होत आहेत .
राज्य साखर संघाचे पद मिळाल्यानंतर पी आर पाटील यांच्या छबीचा फायदा सत्ताधारी गटाला होईल असा विश्वास कार्यकर्यांना होता . मात्र अवघ्या पाच जागेवर पी आर पाटील यांना समाधान मानावे लागले. गेल्या अनेक वर्षाची एकहाती सत्तेत असणाऱ्या पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे . गत काही संस्थांच्या निवडणुकीत अशोक पाटील गटाला अपयश आले होते ते या निवडणुकीने धुवून निघाले .
मतदान मोजणी केंद्रावर दोन्ही गटाकडून कार्यकर्ते तळ ठोकून होते . काही प्रभागांत व थेट लोकनियुक्त सरपंच पद लागल्यानंतर अशोक पाटील गटाने एकच जल्लोष केला गावातील मुख्य रस्ते गुलालने माखले होते पाटील व विजयी उमेदवारांचे गावातील मुख्य रस्त्यावर औक्षण करण्यात आले . अशोक पाटील, व्ही टी पाटील मारुती जाधव गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मताधिक्य पुढील प्रमाणे लोकनियुक्त सरपंच डॉ मदन बाबासाहेब शेटे (३८५),सौ राजश्री मारुती जाधव (२३५),लक्ष्मण गणपती माने (२१६),सिंधुताई गणपती वायदंडे (२११),सुनील भीमराव पाटील (४०),सुनील बापूसो कामेरिकर(१८०),सौ नीता संग्राम माळी (४४),सुवर्णा मनोहर धनवडे (२८), सुजित रघुनाथ देवकर (१०८), रेश्मा महादेव देवकर (११८),प्रणिता विजय भालकर (८१)