शिष्यवृत्ती च्या हक्कापासुन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचे पाप केंद्र शासनाने करु नये :- सर्व सामाजिक संघटन..
परळी / प्रतिनिधी :- आज दिनांक 27 डिसेंबर रोजी परळी शहरात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी परळीतून विद्यार्थी तर्फे भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना टपाल पेटीचा माध्यमातून प्रधानमंत्री कार्यलयला १५०० पोस्ट कार्ड पाठविण्यात आले
प्रथम शासनाकडे हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज आले. मात्र नंतर अचानक इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. हा अल्पसंख्याकांवर अन्याय आहे. आम्ही भारत सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि शिष्यवृत्ती सुरू ठेवण्याची आणि शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्याची मागणी शेख एजाज यांनी केली.
या वेळी जमियते उलेमा हिंद चे बीड जिल्हा अध्यक्ष मौलाना मुफ्ती अश्फाक कासमी, मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य शेख अब्दुल करीम,वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव प्रा.मिलींद घाडगे, ख्रिश्चन धर्मगुरु फादर अमीत दुपते, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख जमील अध्यक्ष, पीटीआय चे पञकार गणपत अप्पा सौंदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शहरातील अभिनव विद्यालय,हजरत बिलाल ऊर्दु शाळा,अंजुमन उलुम कन्या शाळा,इमदाद उल उलुम ऊर्दु शाळा, मिल्लिया ऊर्दु शाळा,डाॅ झाकेर हुसेन ऊर्दु शाळा, जि प ऊर्दु शाळा, न्यु हायस्कूल शाळेतील सुमारे १५०० विद्यार्थ्यां मार्फत पंतप्रधान साहेबांना मागणीचे पोस्ट कार्ड पाठविण्यात आले.
या वेळी गुलशन ए खिजरा सेवा भावी संस्था परळी चे अध्यक्ष शेख अख्तर हमीद, उम्मीद सेवा संघटने चे अध्यक्ष शेख जावेद,महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे बीड जिल्हाध्यक्ष शेख मुख्तार, विश्व मानवाधिकार संघटनेचे इलयास भाई,सुरज पठाण,पञकार मुकरम शेख,महादेव गित्ते,मुदस्सिर शेख,सबाहत अली, अबुतल्हा शेख,आदी उपस्थित होते